विश्वास नांगरे पाटीलांनी’तपास पथक’तयार करताच समीर वानखेडेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अटकेच्या भितीने वानखेडे हादरले

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला(Aryan Khan) मुंबई उच्च न्यायालयाने सलग तीन दिवसाच्या सुनावणीनंतर कार्डिलिया ड्रग्स प्रकरणात अखेर आज जामीन मंजूर केला आहे. आर्यन खान बरोबरच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धनेचा या दोघांचाही जामीन मंजूर झालेला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer wankhede) यांनी दोन तारखेला ड्रग्स प्रकरणात या तिघांनाही अटक केली होती. तेव्हापासून हे तिघेही न्यायालयीन कोठडीमध्ये होते.

सत्र न्यायालयाने आर्यन खानचा यापूर्वी दोन वेळा जामीन फेटाळला होता. सत्र न्यायालयाने दोन वेळा जामीन फेटाळल्यानंतर आर्यन यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात २० तारखेला धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर २६ ऑक्टोबरला सुनावणीस सुरुवात झाली. सलग तीन दिवस सुनावणी झाल्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तब्बल पंचवीस दिवसानंतर आर्यन खान ‘मन्नत’वर जाणार असल्याने शाहरुख खानसाठी हा मोठा दिलासा आहे.

एकीकडे आर्यन खानला जामीन मिळाला आहे, तर दुसरीकडे आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरून अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. मुंबई पोलीस अटक करतील या भीतीने समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली, असून या याचिकेवर सध्या सुनावणी देखील सुरू असल्याचं कळतंय.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल याने पंचवीस कोटींची बोलली सॅम डिसूजा आणि पुणे पोलिसांच्या ताब्यात असणारा किरण गोसावी यांच्यामध्ये झाली होती. तर 18 कोटींवर डील करूयात कारण यातले आठ कोटी वानखेडे यांना आपल्याला द्यायचे आहेत. असं दोघेजण एकमेकांशी बोलताना मी ऐकलं असल्याचा खळबळजनक दावा प्रभाकर साहिल यांनी आपल्या एफिडेविट मार्फत सादर केला होता. तेव्हापासून या प्रकरणाला कलाटणी मिळाल्याचे पाहायला मिळाले.

किरण गोसावी याला आज पुणे पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्याने एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हीडिओ शेअर्स केला होता. यामध्ये तो प्रभाकर साईल यांनी लावलेले सगळे आरोप फेटाळून लावत, त्यानेच आणि त्याच्या दोन भावांनीच पैसे घेतल्याचा आरोप केला. त्याच बरोबर प्रभाकर साहिल याचे व्हाट्सअप डिटेल्स, कॉल डिटेल्स, चेक करण्याची विनंती देखील त्याने केली आहे. या व्हिडिओ नंतर काही तासातच पुणे पोलिसांनी त्याला अटक करत आज कोर्टासमोर देखील हजर केलं होतं. किरण गोसावी याला न्यायालयाने आठ दिवसाची पोलिस कोठडीही सुनावली आहे.

कार्डिलिया ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला आज जामीनही मंजूर झाला, दुसरीकडे या प्रकरणात कमालीचा चर्चेत आलेला स्वतंत्र साक्षीदार, किरण गोसावी हा देखील पोलिसांच्या अटकेत आहे. पहिल्यांदा या प्रकरणाचा सगळा तपशील मांडणारा, साक्षीदार प्रभाकर साहिल सध्या पोलीस प्रोटेक्शनमध्ये आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

समीर वानखेडे यांनी या प्रकरणाची आता धास्ती देखील घेतल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाचखोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार पोलिस अधिकाऱ्यांची टिम घटीत करण्यात आली आहे. समीर वानखेडे विरोधात दाखल करण्यात आलेल्या चाकरीचा एकत्रितपणे मुंबई पोलीस तपास करणार असल्याची माहीत आहे. मुंबई पोलीस अटक करतील या भीतीने आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकेविरोधात याचिका दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या-आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नव्या पात्राची एन्ट्री प्रसिद्ध हॅकर मनीष भंगाळेच्या दाव्याने देशच हादरून गेलाय 

आर्यन खान ड्रग्स प्रकरणातलं पहिलं पात्र पुणे पोलिसांच्या अटकेत; मुख्य सुत्रधाराचा चेहरा येणार समोर 

 ज्ञानदेवाला लाडाने दाऊद म्हणण्या इतका महाराष्ट्र पुरोगामी होता; कुठे नेवून ठेवलाय हा महाराष्ट्र माझा 

Tata समूहाचा इतिहास आणि भारताच्या विकासात असणारे त्याचे योगदान वाचून,तुम्ही अक्षरशः वेडे व्हाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.