WhatsApp तुम्हाला Whatsapp Payment च्या माध्यमातून कमावून देतय असेही पैसे

0

WhatsApp ने WhatsApp Payment- व्हॉट्सॲप पेमेंट ही नवीन सुविधा आपल्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे. WhatsApp Payment या फिचरचा वापर त्यांच्या जास्तीत जास्त WhatsApp वापरकर्त्यांनी  करावा यासाठी काही खास ऑफर्स WhatsApp ने दिल्या आहेत. वापरकर्त्यांना WhatsApp Payment वर कॅशबॅक दिला जात आहे. त्यामुळे WhatsApp Payment चे वापरकर्ते वाढण्यास व्हॉट्सॲपला मदत होईल.

WhatsApp Payment ने वापरकर्त्यांने एखादा ऑनलाइन व्यवहार केल्यास 51 रूपयांचा कॅशबॅक त्यांना दिला जात आहे.गेल्या महिन्यात देशात WhatsApp ने UPI वरून आपल्या वापरकर्त्यांना व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. व्हॉट्सॲपच्या या नवीन WhatsApp Payment सुविधेमुळे फोन पे आणि पेटीएम सारख्या पेमेंट्स अ‍ॅपला मोठी टक्कर देताना पाहायला मिळेल. Whatsapp कडून ‘Give Cash, Get 51 back’ या नावाने ऑफर चालवण्यात येत आहे.

त्या माध्यमातून युजर्सला पेमेंट करून या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या लोकांना केलेल्या कितीही रुपयांच्या ऑनलाइन व्यवहारांवर हा कॅशबॅक त्यांना देण्यात येणार आहे. व्यवहार करण्यासाठी कुठल्याही रकमेची अट ठेवण्यात आली नाही. म्हणजेच कमीत-कमी रकमेची कोणतीही अट ठेवकेली नाही. तुम्ही अगदी 10 रूपये सुध्दा एखाद्या व्यक्तीला पाठवले तर तुम्हाला 51 रूपयांचा कॅशबॅक मिळवता येणार आहे.

WhatsApp Payment करत असताना तुम्हाला 51 रुपये कॅशबॅक दिला जाणार आहे. परंतु तुम्हाला फक्त पाच व्यवहारांसाठी हा कॅशबॅक मिळणार आहे. सध्या ही ऑफर Android चं बीटा व्हर्जन असलेल्या WhatsApp वापरकर्त्यांना देण्यात येत आहे. परंतु लवकरच ही ऑफर WhatsApp च्या सर्वच वापरकर्त्यांना देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच सर्वच WhatsApp वापरकर्त्यांना या कॅशबॅक ऑफरचा लाभ घेता येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

WhatsAppकंपनी (whatsapp payments in india) येणाऱ्या काळात जास्तीत जास्त UPI वर आधारित ऑनलाइन व्यवहार वाढवण्याचा विचार करत आहे. सध्या देशात PhonePay आणि
GooglePay चे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. Phonepay आणि Google Pay या दोन्ही पेमेंट्स अ‍ॅपचा ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे आता या WhatsApp Payment कॅशबॅक ऑफरला यामुळे  या दोन्ही अ‍ॅपला अजून एक मोठा स्पर्धक मिळाला आहे.

हेही वाचा-WhatsApp आता तुमच्या मोबाईलमध्ये चालणार नाही, जाणून घ्या काय आहे नवीन नियम..

तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी तासनतास गप्पा मारतो? तुम्हाला आता समजू शकते.

इंटरनेट नसेल तरीदेखील तुम्ही वापरू शकता WhatsApp वाचा कसे..

या फोटोची कहाणी वाचल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, सर्वांनी एकदा वाचा म्हणजे आपल्याला आपल्या माणसाची किंमत कळेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.