मोठी बातमी! पाकिस्तानातील मुलींची चिनी पुरुष करत आहेत खरेदी आणि पुढे असे होत आहे, वाचून बसेल धक्का

0

चिनमधील पुरूष पाकिस्तानमधील ख्रिश्चन मुलींसोबत विवाह करत असल्याचे उघड झाले होते. या बातमीमुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. पाकिस्तानी प्रशासनाला देखील या घटनेमुळे धक्का बसला होता. प्रशासन खडबडून जागं झालं आणि मुली विक्रीच्या प्रकरणात 50 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाने पाकिस्तानमधील भोंगळ कारभार उघड झाला होता.

कारवाईला होऊन सुध्दा अद्याप देखील हा पाकिस्तानी मुलींची विक्री चालूच असल्याचे परंतु बेकायदेशीर लग्नाचा धंदा पूर्वी उघडपणे चालू आसायचा त्यामध्ये आता थोडा बदल झाला आहे. सध्या मुली विक्रीचा धंदा गुपचूप चालू आहे. 2019 मध्ये एका शोधमोहिमेत हे मॅरेज रॅकेट उघड झाले होते. अनेक चिनी पुरूष पाकिस्तान मध्ये राहणाऱ्या गरीब ख्रिश्चन मुलींसोबत विवाह करत असल्याचे समोर आले होते.

तुमच्या मुलीचे लग्न श्रीमंत व धनदौलत असणाऱ्या कुटुंबामध्ये लाऊन देऊ असं आमिष धाकवून मुलींची चीनमधील पुरुषांशी विवाह करायला भाग पाडत होते. गरीब ख्रिश्चन कुटुंबातील तरुणींची फसवणूक केली जात होती. पाकिस्तानातील अनेक  मुलींची चिनी पुरुषांसोबत लग्न लाऊन देण्यात अनेक पादरी, दुभाषिक चीनी पुरुषांची मदत करत आहेत.

परंतु यामधील बरीचशी लग्न ही फसवणूक करणारी होती. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात राहणाऱ्या गरीब ख्रिश्चन मुलींची फसवणूक करत लग्नाचं आमिष दाखवून चीनमध्ये घेऊन जात असायचे आणि त्या ठिकाणी  त्यांना वेश्या व्यवसाय करायला भाग पाडत असायचे. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर या मुलींचे अनेक अवयवांची देखील विक्री होत असल्याचे देखील समोर आले होते.

पाकिस्तानमधून चीनला घेऊन गेलेल्या मुलींचे  गर्भाशय काढून अवयव विक्रीच्या आंतरराष्ट्रीय का बाजारात मुलीच्या अवयवांची विक्री होत होती, अशी माहिती पाकिस्तानच्या केंद्रीय तपास यंत्रणेला मिळाली होती. ज्या तरुणी वेश्या व्यवसायासाठी योग्य नसतील अशा तरुणींचे अवयव काढून ते का बाजारात विकले जात होते.

अजूनसुद्धा पाकिस्तानमधील गरीब मुलींना चीनमधून मध्यस्थी लोकांच्या मार्फत स्थळे येत असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तान मध्ये हा धंदा चांगलाच फोफावला असल्याचे आता पुन्हा एकदा उघड झाले आहे. पाकिस्तानमधील सीमा भागातील तरुणींची मरदान, पेशावर आणि चारसद्दा यासारख्या शहरांमध्ये अशी लग्न लावून दिली जात आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानच्या प्रशासनाची निष्क्रियता लक्षात येते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.