T20 World Cup 2021:तीन तिघाड काम बिघाड! ‘ही’ आहेत पराभवची कारणे,भारत साखळीतच गारद! टी-ट्वेन्टी नंतर वनडेचही जाणार कर्णधारपद

0

T20 World Cup 2021रविवारी 24 तारखेला पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतीय संघाला दहा विकेट्स राखून धूळ चारली. आणि पाकिस्तानने विश्वचषकात पहिल्यांदाच भारतावर विजय संपादन करत ऐतिहासिक कामगिरी केली. पाकिस्तानकडून भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर चाहते कमालीचे संतापल्याचे दिसले. एवढेच नाही तर अनेक जणांनी भारतीय संघ साखळीतच,गारद होऊ शकतो,अशी शक्यताही वर्तवली.(T20 World Cup 2021: Three triple work failures! ‘These’ are the reasons for defeat, India is in the chain! The captaincy will also go to ODIs after T20)

दुबईमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकाचा (T-20 World Cup 2021) अठ्ठाविसावा सामना आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. विराट कोहलीने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकण्यात अपयश मिळवलं. इंग्लंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अनेकांना जी भीती होती, त्याचीच पुनरावृत्ती आजच्या सामन्यात पहिला मिळाली.

सूर्यकुमारच्या जागी आज ईशान किशनला संधी देण्यात आली. विशेष म्हणजे रोहित शर्माच्या जागी इशनला सलामीवीर म्हणूनही पाठवण्यात आले. मात्र विराटच्या हा निर्णय सपशेल फेल गेला. धोनी मेटॉर म्हणून आल्यानंतर, भारतीय संघाच्या अप्रोचमध्ये बदल होईल,असं सगळ्यांना वाटलं. मात्र तसं काहीही झालं नाही. आणि पुन्हा एकदा महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ कोलॅप्स होताना चाहत्यांना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांना आपल्या नावाला साजेसा असा खेळ करता आला नाही.

दाबडतोड फलंदाजी करण्यासाठी ईशान किशन आज संधी देण्यात आली, मात्र असं काहीही झालं नाही. ईशान किशन आणि के एल राहुल सलामीवीर म्हणून मैदानात उतरले खरे मात्र ते मोठी खेळी करतील, असं कधीही वाटलं नाही. कोणत्याही भारतीय खेळाडूंच्या बॉडी लॅंग्वेजवरून आज आपण जिंकू शकतो, असं एकदाही वाटलं नाही. 2.5 षटकात केवळ अकरा दहा झाल्या असताना ईशान किशन बाद झाला. त्याच्यापाठोपाठ के एल राहुलने देखील न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर आपली नांगी टाकली, आणि पवेलियनचा रस्ता धरला.

 

भारतीय संघाच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आलं नाही. याउलट दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने ही खेळपट्टी फलंदाजांसाठी किती अनुकूल होती? हे दाखवून दिलं. खेळपट्टीवर चेंडू सरळ बॅटवर येत होता,मात्र विराट कोहलीच्या या संघाने मोठ्या सामन्यात आम्हाला अजूनही फलंदाजी करता येत नाही, हे दाखवलं. एरवी याच सलामीवीरांना पाहून समोरच्या गोलंदाजांची पळताभुई होती. हे आपण सराव सामन्यात देखील पाहिले. मात्र महत्त्वाच्या सामन्यात या खेळाडूंना दबाव हँडल करता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

 

विराट कोहलीने यापूर्वीच आपण टि-ट्वेटी कर्णधार पदाचा या विश्वचषकानंतर राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले असल्याने हा टी-20 विश्वचषक भारतीय संघासाठी खास होता. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या झालेल्या आजच्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला असल्याने,भारतीय संघाच्या विश्वचषक जिंकण्याच्या आशा सोडा भारताच्या आता सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाला बोल्पुर देखील धावा करता आल्या नाहीत. 20 षटकात भारतीय संघाने केवळ 111 धावा केल्या. सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा झालेला हा दारुण पराभव भारतीय संघाच्या जिव्हारी लागला असला तरी, या पराभवामुळे अनेक प्रश्न उपस्थित देखील झाले आहेत. ईशान किशनला सलामीला पाठवण्याचा कोणाचा निर्णय होता? त्याचबरोबर हार्दिक पांड्याला पुन्हा संधी का दिली गेली? या दोन प्रश्नांची उत्तरे आता क्रिकेट चाहत्यांना या मंडळींना द्यावी लागणार आहेत.

फलंदाजीसाठी अनुकूल नव्हती हे कारण आता होऊ शकत नाही कारण, 111 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या न्युझीलंड संघाने केवळ दोन विकेट गमावल्या. आणि 111 धावांचा टप्पा केवळ १४.३ षटकात पूर्ण केला. भारतीय संघाचा आज केवळ पराभव झाला नाही तर सेमीफायनल मध्ये जाण्याचा आशा देखील जवळपास मावळल्या आहेत. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी कोणाला स्वप्नातही वाटले नसेल भारत साखळीतच गारद होईल. मात्र ही परिस्थिती त्यांच्यावर खराब खेळ केल्यामुळे ओढवली आहे, हे देखील आपल्याला नाकारता येणार नाही.

विश्वचषकाचा संघ निवडल्यानंतर महेंद्रसिंग धोनीला या संघाचा मेंटॉर म्हणून निवडलं. मात्र त्याच्या टीमला काही फायदा झाला नसल्याचे दिसत आहे. भारतीय संघाच्या खराब प्रदर्शन पाठीमागे अनेक कारणे आहेत. मात्र काही क्रिकेट विश्लेषक सांगतात, धोनीच्या येण्यामुळे या संघात निर्णय घेणारी मंडळी अधिक झाली. आणि ज्या वेळेस असं होतं, त्यावेळेस त्याचा खेळावर परिणामही होतो. खेळाडूंना नक्की कोण योग्य वाटतोय हे कळणं अवघड होऊन बसतं. आणि म्हणून हे एक कारण भारतीय संघाच्या खराब प्रदर्शन पाठीमागे असू शकतं.

महेंद्रसिंग धोनीचा मेटॉर या भूमिकेकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र या भूमिकेत तो अपयशी ठरला असं म्हणण्यास आता हरकत नाही. धोनी ज्यावेळेस कर्णधार होता, त्यावेळेस त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आयसीसीच्या तिन्हीं ट्रॉफी आपल्या नावावर केल्या. त्याने केलेल्या विक्रमामध्ये अनेकांचे योगदान आहे, ही गोष्ट खरी असली तरी, धोनी हा आपली टीम निवडताना कोणाचेही ऐकत नव्हता. त्याला हवी असणारी टीम तो निवडायचा. हवी असणारे निर्णय घेत होता. यामुळे देखील धोनी सक्सेसफुल झाला, हे कदापीही नाकारता येत नाही.

भारतीय संघाला या विश्वचषकामध्ये साखळी सामन्यातच गारद व्हावं लागणार असल्यामुळे, आता विराट कोहलीच्या कर्णधार पदावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. एवढंच नाहीतर विराट कोहलीचे आता वन-डे क्रिकेट संघाचे कॅप्टनपदही जाण्याची शक्यता अधिक जाणवत आहे. या विश्वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य कोच म्हणून राहुल द्रविडची निवड केली जाणार आहे. तर आता वनडेचा आणि टी ट्वेंटीचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे. अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

हेही वाचा –T20 World Cup 2021: तुम्ही कोणालाही खेळवा; न्यूझीलंड २०१९ विश्वचषकाप्रमाणे उद्याही भारताला धूळ चारणार 

T20 WC: टि-ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये हे दोन संघ पोहोचणार; या दिग्गजाने केली भविष्यवाणी

T20 WC: एकीकडे पाकिस्तानीने विजयाची हॅटट्रिक केली,तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या फॅन्सनी पाकिस्तानच्या फॅन्सची धुलाई केली! व्हिडिओ व्हायरल 

मोठी बातमी! पाकिस्तानातील मुलींची चिनी पुरुष करत आहेत खरेदी आणि पुढे असे होत आहे, वाचून बसेल धक्का

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.