T20 WC: एकीकडे पाकिस्तानीने विजयाची हॅटट्रिक केली,तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या फॅन्सनी पाकिस्तानच्या फॅन्सची धुलाई केली! व्हिडिओ व्हायरल

दुबईमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातला चोविसावा सामना आज पाकिस्तान(Pakistan)आणि अफगाणिस्तान(Afganistan)­ यांच्यामध्ये दुबई(Dubai) इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत अफगानिस्तान संघाने 20 षटकात 148 धावा केल्या. 148 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार पाकिस्तान संचाने हा सामना एक षटक आणि पाच गडी राखून जिंकला.

पाकिस्तान संघाने या विजयाबरोबरच विश्वचषकातला सलग तिसरा सामना जिंकत हॅट्रिक केली. आणि या विश्वचषकाच्या सेमी फायनलचे तिकीट जवळपास निश्चित केलं. 148 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. मात्र कॅप्टन बाबर आजम आणि डावखुरा फलंदाज फकर जमान यांनी डाव सावरत, पाकिस्तान संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन ठेवलं.

१२ चेंडूत २५ धावांची आवश्यकता असताना, हा सामना अफगाणिस्तानच्या बाजूने चुकला आहे, असं वाटत होतं. मात्र, अष्टपैलू खेळाडू असिफ अली याने एकाच षटकात 4 उत्तुंग षटकार लगावत पाकिस्तान संघाला एकहाती सामना जिंकून दिला. असिफ अली याने ७ चेंडूच २७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या विजयाबरोबरच पाकिस्तान संघाने विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक करत, जवळपास सेमीफायनलचे तिकीटही मिळवलं आहे.

एकीकडे दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला होता तर दुसरीकडे मैदानाबाहेर स्टेडियम मध्ये अफगाणिस्थान क्रिकेटचे फॅन आणि पाकिस्तान क्रिकेटचे चाहते यांच्यातही एक सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. हा सामना प्रचंड रोमहर्षक झाला. विनातिकीट स्टेडियममध्ये प्रवेश करत अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तान चाहत्यांना चांगलेच बदडून काढल्याचे एका व्हिडीओत दिसत आहे.

अफगाणिस्तानचे चाहते आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये नेमकं कशामुळे भांडण झालं? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र, अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तान चाहत्यांना चांगलंच झोडपून काढल्याने एका व्हिडीओ दिसत आहे. हे भांडण होण्याचे अधिकृत तसं कारण स्पष्ट झालं नाही.

मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने अफगानिस्तानचे चाहते विनातिकीट स्टेडियममध्ये घुसल्याचे, एक ट्विट केले आहे. अफगाणिस्तानचे चाहते स्टेडियममध्ये विनातिकीट घुसल्याने पाकिस्तानच्या चाहत्यांकडे तिकीट असूनही त्यांना जागा मिळाली नाही. या कारणावरून वाद झाला असावा, आणि या वादाचे हाणामारीत रूपांतर झालं असल्याचे बोलले जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.