T20 World Cup 2021: तुम्ही कोणालाही खेळवा; न्यूझीलंड २०१९ विश्वचषकाप्रमाणे उद्याही ‘भारताला’ धूळ चारणार

0

T-20 World Cup 2021: विराट कोहलीच्या संघाला पाकिस्तान संघाने 24 तारखेला झालेल्या पहिल्या सामन्यात दहा विकेट राखून सहज पराभूत करत, ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताचा हा पराभव कुठल्याही विश्वचषकातला पाकिस्तान कडून झालेल्या पहिलावहिला पराभव ठरला. यापूर्वी भारत विश्वचषकात पाकिस्तानकडून कधीही पराभूत झाला नव्हता. मात्र भारताने पाकिस्तान समोर नांगी टाकत, नको असणारा विक्रम आपल्या नावावर करून घेतला. (T20 World Cup 2021: You play anyone; New Zealand will dust off ‘India’ tomorrow like the 2019 World Cup)

पाकिस्तान विरुद्ध भारताचा झालेला पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे, कधी कोणता संघ बाजी मारेल? हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचं समिकरणच बिघडून गेलं असल्याचे, दिसून येत आहे. या स्पर्धेत आता भारतावर ‘करो या मरो’ची स्थिती आली असून, उद्या 31 ऑक्टोंबरला न्यूझीलंड विरुद्ध भारताचा या स्पर्धेततला दुसरा सामना होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड दोन्हीं संघ पाकिस्तान संघाकडून पराभूत झाले आहेत. क्रिकेट विश्वात पाकिस्तान या दोन्ही बलाढ्य संघांना सहज पराभूत करेल, असं कधी कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. मात्र पाकिस्तानने ही किमया करून दाखवली असून, या दोन्हीं संघावर आता साखळीतच गारद होण्याची नामुष्की देखील ओढवली आहे.

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर उद्या या दोन्ही संघात महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात उद्या मैदानामध्ये भारत कोणते 11 खेळाडू उतरवणार? हा मोठा प्रश्न विराट कोहली आणि संघासमोर असणार आहे. हार्दिक पांड्याच्या जागी ‘लॉर्ड शार्दुल ठाकूर’ला संधी मिळायला हवी, असं अनेक दिग्गजांनी म्हटलं आहे. हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करत नसल्याने, भारतीय संघाचे कॉम्बिनेशन बिघडुन जातं आहे. शिवाय गेल्या वर्षभरापासून तो लईत देखील नसल्याने, उद्या तो अंतिम 11मध्ये नसणार असल्याचं बोललं जातंय.

लेफ्टआर्म पेसर समोर भारताचे प्रमुख फलंदाज अडखळताना पाहायला मिळते. भारतासाठी धोक्याची घंटा म्हणजे, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी यापूर्वी विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये देखील सुरुवातीला धक्के देत भारतीय संघाला विश्वचषक २०१९ मधून गाशा गुंडाळायला लावला होता. न्यूझीलंडच्या लेफ्टआर्म पेसरकडून सुरुवातीची काही षटके भारतीय फलंदाजांना संभाळून खेळावे लागणार आहे. जर सुरुवातीच्या षटकांमध्ये भारताच्या काही विकेट्स गेल्या तर भारतीय संघ या सामन्यात पिछाडीवर पडल्याचे पाहिला मिळू शकतं.

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मात्र, न्यूझीलंड संघ भारतीय संघापेक्षा तिन्ही क्षेत्रांत अधिक तुल्यबळ वाटतोय. शिवाय न्युझीलंड टि-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताकडून एकदाही पराभूत झालेला नाही. याउलट दुसरीकडे भारतीय संघासमोर अंतिम अकरा निवडण्याचाच मोठा प्रश्न उभा राहणार आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताच्या एकाही गोलंदाजाला साजेशी गोलंदाजी करता आली नाही. भुवनेश्वर कुमारची दुखापत हा भारतासाठी चिंतेचा विषय असून, त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारला या सामन्यात डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून,या दोघांच्या जागेवर ठाकूर आणि राहुल चहरला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या दोघांना संधी मिळाल्यामुळे भारत गोलंदाजीत मजबूत होणार आहे, तर एका अष्टपैलू खेळाडूची संघात निवड झाल्याने संघाचा समतोल देखील राखता येणार आहे. आणि म्हणून भारतीय संघ या दोघांचा अंतीम अकरामध्ये समाविष्ट करण्याची शक्यता जास्त आहे.

भारतीय संघाने कोणतेही अकरा खेळाडू खेळविले तरीदेखील भारतीय संघाच्या तुलनेत न्यूझीलंडचा संघ अधिक बलवान वाटत असून, त्यांच्याकडे भारतीय संघाला सुरुवातीला धक्के देणारे अनेक गोलंदाज आहेत. याउलट भारतीय गोलंदाजी सध्या चिंतेचा विषय राहिली असून, न्यूझीलंडचे फलंदाज देखील भलतेच लईच आहेत. वरील सर्व गोष्टीचा विचार करून विश्लेषण केलं तर, या सामन्यात न्यूझीलंडचा संघ फेवरेट असल्याचं दिसतं.

या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला तर,भारतीय संघाला टी ट्वेंटी विश्वचषकच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्यापासून वंचित राहावं लागू शकतं. उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर, विराट कोहलीसाठी हा खूप मोठा पराभव म्हणावा लागेल. कारण विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा शेवटचा टि ट्वेंटी वर्ल्ड कप आहे. कोहलीने या पूर्वीच आपण टि-ट्वेंटी वर्ल्डकप नंतर या संघाचा कर्णधार पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

हेही वाचा- T20 WC: टि-ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दोन संघ पोहोचणार दिग्गजाने केली भविष्यवाणी 

T20 WC: एकीकडे पाकिस्तानीने विजयाची हॅटट्रिक केली,तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या फॅन्सनी पाकिस्तानच्या फॅन्सची धुलाई केली! व्हिडिओ व्हायरल 

मोठी बातमी! पाकिस्तानातील मुलींची चिनी पुरुष करत आहेत खरेदी आणि पुढे असे होत आहे, वाचून बसेल धक्का 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.