T20 WC: टि-ट्वेंटी वर्ल्डकपच्या ‘फायनल’मध्ये ‘हे’ दोन संघ पोहोचणार; ‘या’ दिग्गजाने केली भविष्यवाणी

दुबईमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात सुरुवातीच्या काही सामन्यात अनेक धक्कादायक उलटफेर पाहायला मिळाले. क्रिकेट विश्वात कोणी स्वप्नातही विचार केला नसेल, भारतीय संघाला पाकिस्तान संघ इतक्या सहज पराभूत करेल. मात्र हा ऐतिहासिक उलटफेर २४ तारखेला क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाला. एवढे कमी होते की काय म्हणून, पाकिस्तानने पुन्हा एकदा या विश्वचषकातला दुसरा विजय संपादन करत तगड्या न्यूझीलंडला (New Zealand) देखील पराभूत केले.

२०२१ टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी या स्पर्धेतला सर्वात फेवरेट संघ वेस्टइंडीज आणि भारत असल्याचे अनेक दिग्गजांनी म्हटलं होतं. याचबरोबर न्यूझीलंडच्या संघाला देखील फेवरेट मानलं गेलं होतं. मात्र या तिन्हीं संघांना सुरवातीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आणि सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. सुरुवातीच्या काही सामन्यात खेळाडूंच्या परफॉर्मन्स आणि संघाच्या कामगिरीचा विचार करत, इंग्लंडच्या दिग्गज ऑलराऊंडरने या विश्वचषकाचे दोन फायनलिस्ट निवडले आहेत.

हे दोन फायनलिस्ट पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र त्याने निवडलेल्या विश्वचषक २०२१ च्या फायनलिस्टने आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमधून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सगळे सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. कदाचित या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन इंग्लडचा दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोकने (Ben stock )या स्पर्धेतला आतापर्यंतचा एकही सामना न गमवलेल्या पाकिस्तान आणि इंग्लंड संघ विश्वचषक २०२१ चे फायनलिस्ट होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून काही वैयक्तिक कारणांमुळे क्रिकेटपासून दूर राहिलेल्या इंग्लंडचा बेन स्टोकने पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये या विश्वचषकाचा फायनल खेळवण्यात येणार असल्याची भविष्यवाणी केली असली तरी, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जात असल्याने २०२१ च्या टि-ट्वेंटी विश्वचषकाच्या फायनलमध्ये कोणते दोन संघ पोचचतील हे कोणीही ठाम सांगू शकणार नाही.

मात्र बेन स्टोक याने आत्तापर्यंत झालेल्या खेळाचे विश्लेषण करून, आपली भविष्यवाणी केल्याचा अंदाज क्रिकेट चाहत्यांना येऊ शकतो. विश्वचषकला सुरुवात होण्यापूर्वी अंतिम 12 मधील ग्रुप दोन गटातून न्यूझीलंड आणि भारत हे सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील असा प्रत्येकाने अंदाज लावला होता. मात्र या विश्वचषकात सुरुवातीच्या सामन्यात अनेक उलटफेर बघायला मिळाल्याने, या दोन्ही संघावर आता साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली आहे.

31 ऑक्टोंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन्ही संघाचा या विश्वचषकातला दुसरा सामना खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात जो संघ पराभूत होईल त्याच्यासाठी या विश्वचषकाच्या सेमी फायनल मध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे गट 2 मधला एक तुल्यबळ संघ, जो विश्वचषकाच्या विजयाचा दावेदार म्हणूनही पाहिलं जात होतं, असा एक संघ साखळीतच गारद होताना क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

तर दुसरीकडे अंतिम१२ मधील गट१@ मधून देखील अनेक उलटफेर पाहायला मिळाले. टी-ट्वेंटी फॉर्मेटचे चॅम्पियन म्हणून ओळख असणाऱ्या वेस्टइंडीज संघावर देखील आता साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली आहे. इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका संघाकडून वेस्टइंडीजला पराभवाचा सामना करावा लागला असल्याने त्यांच्यासाठी सेमी फायनलची मजला आता खूप लांब दिसत असून, जवळपास संपुष्टात आली आहे असं म्हटलं तरी, अतिशयोक्ती होणार नाही.

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.