टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार

0

शेतीत फक्त शेतकऱ्यांचं मरण आहे. हे काही अंशी खरेही आहे. पिक भरात आल्यानंतर वरून वरुणराजा बरसला तर सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसतं. शिवाय स्वतःचा माल स्वतःला विकताही येत नाही. त्यामुळे शेतीत यश मिळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय त्याने शेतातून भरघोस उत्पन्न काढले, तरी त्याच्या मालाला भाव मिळेलच याची काहीही गॅरंटी नसते. मात्र पिकवलेला माल त्याने साठवून ठेवला, आणि दर आल्यानंतर बाहेर काढला तर, मात्र तो मालामाल होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. शेतकऱ्यांनी पिकविलेला माल जास्त दिवस रहावा यासाठी टाटा स्टील्सने ‘सोल्युशन ऍग्रो नेस्ट’ हे कांदा साठवणूकीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांच्याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड पाहायला मिळते. जे लोक कांदा साठवून ठेवत असतात त्यांचा चांगला फायदा होत असतो. मात्र कांदा फार काळ टिकत नसल्यामूळे बरेचसे शेतकरी साठवून ठेवण्याच्या जास्त भानगडीत पडत नाहीत. शेतकऱ्याचा कांदा जेव्हा विक्रीला काढला जातो तेव्हा त्याला बाजारात भाव नसतो. परंतु कांद्याची साठवणूक करून व्यापरी वर्ग मोठ्या प्रमाणात नफा कमावत असतात. आणि या साखळी मुळे कांदा बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो. (Tata Steel’s now have special plans for farmers!  The concept will now be implemented for onion storage.)

महाराष्ट्रात खूप मोठा प्रमाणात कांदा उत्पादन केले जाते. अलीकडे शेतकरी देखील या पिकाला जास्त प्राधान्य देताना दिसून येतो. पूर्वी पेक्षा आताचा शेतकरी हुशार झालेला आहे. पूर्वी तो साठवणुकीच्या फंदात पडत नव्हता. आता मात्र तो कांदा साठवताना पाहायला मिळतो. मात्र कांदा साठवणूकीनंतर देखील मोठ्या प्रमाणात कांदा खराब होतो, हे तुम्हा शेतकऱ्यांना चांगलंच माहिती आहे.  हवामानातील बदलांमुळे साठवणूक ठेवलेला कांदा खराब होत असतो. त्यामुळे मग शेतकऱ्यांना अधिक आर्थिक नुकसान सहन करावे लागते.  मात्र आता अशा शेतकऱ्यांसाठी टाटा स्टील कंपनीने यासाठी एक आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे.

कांदा हा चिरकाल टिकत नाही, आणि त्यामुळेच कांदा साठवणूक करत असताना तंत्रशुद्ध पद्धतीनेच साठवणूक करण्याची गरज आहे. कांद्याचे बाजार भाव नेहमी बदलत असतात. कांद्याला कधी उचांकी भाव मिळतो तर कधी शेतकऱ्याला उत्पादन खर्च सुध्दा वसूल होत नाही. यामुळे आता शेतकरी कांदा साठवणूक करण्याकडे वळताना पाहायला मिळत आहेत. यामुळेच फक्त व्यापाऱ्यांचा फायदा न होता शेतकऱ्यांना देखील आता फायदा मिळवणे शक्य आहे.

साठवणूक केलेला कांदा खराब होऊ नये यासाठी उपाय शोधत टाटा स्टीलच्या “मॉड्यूलर कंस्ट्रक्शन सोल्युशन ब्रांड नेस्ट”ने भारतातील पहिले कांदा साठवणुकीसाठी एक “सोल्युशन ऍग्रो नेस्ट” लॉन्च केले आहे. या सोल्युशनमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यामुळे अनेक दिवस कांदा साठवता येणार आहे.

या तंत्रज्ञानामध्ये विज्ञान, नवीन अद्यावत इनोवेशन चा वापर करण्यात आला आहे. बर्‍याचदा शेतकर्‍यांनी साठवणूक करण्याच्या पद्धतीत बर्‍याच कमतरता असतात. तसेच कांदा साठवणुकीचे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा बराच कांदा चाळीतच खराब होतो. टाटा स्टीलच्या नेस्ट इन आणि इनोव्हेटर टीमने एक स्मार्ट वेअर  हाऊस म्हणजे गोदाम सोलुशन ॲग्रोनेस्ट विकसित केले आहे.

या तंत्रज्ञानामध्ये तापमान, ओलावा आणि गॅसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सर लावण्यात आले आहे. हे  सेंसर कांदा खराब होण्याआधी आपल्याला माहिती देत आहेत. यामुळे आपण साठवणूक केलेला कांदा  किती दिवस टिकणार हे देखील आपल्याला माहिती होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कांदा खराब होण्या अगोदर माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कांदा साठवणूक अधिक उत्पन्न मिळवता येणार आहे.

हेही वाचा: शहीद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला; व्हीडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी 

पेट्रोल दोनशे रुपयांवर गेल्यास फायदाच फायदा; दुचाकीवर फिरता येणार ट्रिप्सी,प्रदेशाध्यक्षांची मोठी घोषणा 

धक्कादायक! हिंदूंवर मोठा हल्ला, मंदिरांवर हल्ला करून २९ घरे पेटवली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.