शहीद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला; व्हीडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

0

काश्मीरमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आतंकवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सतत चकमक होत असून यामध्ये अनेक भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटना घडल्याचे समोर आल्या आहेत.

गुजरात मधील कपडवंज तालुक्यातील वंजारीया गावचे हरीश परमार हे जवान देखील काश्मीरमध्ये चकमकीत शहीद झाल्याची घटना शनिवारी घटल्याची माहीती मिळते. हरीश परमार हा 25 वर्षीय जवान शहीद झाल्याची बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हरीश परमार हा तरूण २०१६ला सैन्यात भरती झाला होता. पाच वर्षे नोकरी केल्यानंतर वयाच्या २५ व्या वर्षी तो ‘पुंछ’मध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत शहीद झाला. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील, कपडवंज तालुक्याच्या ‘वंजारी’या गावचा तो सुपुत्र होता. त्याच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हजारो लोकांचा जनसमुदाय लोटला होता. हा अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

सोमवारी सकाळी शहीद हरिश परमार याचे पार्थिव अहमदाबाद विमानतळावर पोहोचले, आणि सगळीकडे शोककळा पसल्याचे पाहायला मिळाले. जवळपास संपूर्ण खेडा जिल्हा शहीद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकवटला होता. शहीद हरीश परमार याला श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांनी मेणबत्त्या पेटवल्या होत्या. उपस्थित प्रत्येकांचे डोळे आसवांनी गच्च भरलेले पाहायला मिळत होते.

आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून वडील पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. मात्र त्याचवेळी देशाच्या संरक्षणासाठी स्वत:चे बलिदान दिल्याचा देखील अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं. हजारोंचा जनसमुदाय त्याच्या अंत्यसंस्कारासाठी आल्याने हा फक्त माझाच नाही तर संपूर्ण गावाचा विर आहे. संपूर्ण गाव दुःखी आहे हा माझ्यासाठी कधीही न विसरणारा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशाच्या संरक्षणासाठी त्याने आपले प्राण गमावले. हे मला नेहमी आठवण करून देणारं आहे,असंही ते म्हणाले.

शहीद जवान हरीश परमार यांच्या अंत्यसंस्कारा दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटल्याचे पहिला मिळत आहे. या अंत्ययात्रेत असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असल्याचे पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.