‘Tata समूहा’चा इतिहास आणि भारताच्या विकासात असणारे त्याचे योगदान वाचून,तुम्ही अक्षरशः वेडे व्हाल…

0

Tata समूहाने गेल्या काही दिवसांपूर्वी  भारतातील सर्वात जास्त कर्ज असणारी सरकारी कंपनी ‘एअर इंडिया’ खरेदी केली. (Air India Jet) या कंपनीवर साठ हजाराहून अधिक कर्ज असून देखील ‘टाटा समूहा’ने भारत सरकारची ही कंपनी खरेदी केल्याने, त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  मात्र देशाला मदत करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. या समूहाचे देश ज्यावेळी संकटात सापडला आहे त्या-त्या वेळी सर्वात पुढे हा समूह असल्याचे इतिहास सांगतो.(Reading the history of ‘Tata Group’ and its contribution to the development of India, you will literally go crazy …)

कोरोनाच्या काळात पीएम केअर्स फंडात(PM CARE FUND) सर्वात जास्त आणि सगळ्यात पहिल्यांदा पैसे टाकत देशाविषयी, भारतीय लोकांविषयी असणारी त्यांची काळजी स्पष्ट दिसून आली होती. पीएम केअर्स फंडात त्यांनी १५०० कोटी रुपये टाकल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. एवढंच नाही तर देशासाठी माझी सगळी प्रॉपर्टी मला विकावी लागली,तरी देखील मी विकायला मागे पुढे पाहणार नाही,असंही त्यांनी म्हटलं होतं. Ratan Tata invests Rs 1,500 crore in PM Care Fund

१५ ऑक्टोंबर १९३२ साली टाटा समूहाने ‘एअर इंडियाची’ स्थापना करत सर्वप्रथम देशात पहिल्यांदा विमानसेवा आणली. कराचीहून अहमदाबाद ते मुंबई, असं विमान टाटा यांनी स्वतः चालवून आणलं. या ‘एअर इंडिया कंपनी’मध्ये तब्बल ९९९३ कर्मचारी काम करत होते. मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५३ साली ‘राष्ट्रीयकरण’ केलं आणि ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली. On October 15, 1932, the Tata Group founded Air India

प्रचंड नफ्यात असणारी ही कंपनी ‘खाऊजा’ धोरण आल्यानंतर दिवाळखोरीत निघायला सुरूवात झाली. या धोरणांतर्गत भारत सरकारने जेवढे फायद्याचे मार्ग होते,तेवढे सर्व इंडिगो,जेट, एअरवेज या विमान कंपन्यांना विकले. आणि टाटा समूहाने स्थापन केलेली, भारत सरकारची ही कंपनी दिवाळखोरीत निघाली.

भारत सरकारने ‘एअर इंडिया’ विमान कंपनी विकायला काढल्यानंतर, सर्वाधिक बोली लावून, टाटा समूहानेच विकत घेतली. १५ हजार ३०० कोटीसह १८ हजार कोटींची बोली लावून टाटा समूहाने ही कंपनी विकत घेतली. त्यामुळे या कंपनीवर साठ हजार कोटींहून अधिक कर्ज झाले. The company was bought by the Tata Group for Rs 18,000 crore, including Rs 15,300 crore

साठ हजाराहून अधिक अर्ज असणारी ही कंपनी विकत घेतल्यानंतर यासंदर्भात टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून एक भावनिक पोस्टही केली. “जर ‘जेआरडी’ असते तर, त्यांना खूप आनंद झाला असता” असं रतन टाटा म्हणाले. याचे कारण म्हणजे आपणच स्थापन केलेली कंपनी पुन्हा ६८ वर्षानंतर आपल्याकडेच येत असल्याने, हा एक ऐतिहासिक निर्णय,आणि क्षण होता.

‘मिठा’पासून ते ‘सॉफ्टवेअर’पर्यंत अनेक ‘Production’ तयार करणाऱ्या टाटा समूहाने तब्बल ६८ वर्षानंतर पुन्हा एअर इंडिया कंपनी विकत घेतल्याने, ही ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. मात्र एअर इंडियाला कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्याचे आव्हान देखील त्यांच्यापुढे आहे.

मोडखळीला आलेल्या कंपनीला पुन्हा नफ्यात आणून देशाच्या विकासाला हातभार लावावा असं त्यांना वाटलं. मात्र अनेक वेळा देश संकटात असताना टाटा समूहाने केलेली मदत देशावर असणारं प्रेम अधोरेखित करते. ‘टाटा समूहा’चा आणि परिवाराचा देशाच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. आपल्या जवळची 66% प्रॉपर्टी संस्थांना दान करणाऱ्या या समूहाने अशा अनेक संस्था उभारल्या आहेत, ज्या आज देशाचा आत्मा मानल्या जातात.

‘टाटा इन्स्टिट्यूट’ऑफ फंडामेंटल रिसर्च,बाबा अॅटोमिक रिसर्च सेंटर, तारापूरचं अॅटोमिक रिसर्च सेंटर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, खापोलीत असणारं भारतातील पहिले जलविद्युत केंद्र. अशा अनेक संस्था टाटांनी आपल्या पैशातून उभारत देशाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला आहे.

आपल्या पैशातून उभारणार्‍या या संस्थांना आपलंच नाव असावं. असा त्यांचा कधीच हट्ट राहिला नाही. ‘होमी जहांगीर बाबा’ यांनी भारताचा अनु तंत्रज्ञानाचा पाया रचला. त्यांच्या नावाने ‘बाबा अॅटोमिक रिसर्च सेंटर’ ही संस्था भारत सरकारने उभी केली. मात्र भारत सरकार साकारत असणाऱ्या या संस्थेला, टेक्निकल सपोर्ट, पैशाचा पाठपुरावा, ते कसं उभं करायचं? या सगळ्या गोष्टींचे नियोजन टाटा समूहाने केले. आणि टाटा समूहाच्या मदतीने ‘बाबा अॅटोमिक रिसर्च सेंटर” ही ऐतिहासिक संस्था उभी राहिली.

‘बाबा अॅटोमिक रिसर्च सेंटर’ ही संस्था ‘जेनेटिक मॉडीफाय’ वनस्पतींच्या जातींवर संशोधन करते. याशिवाय रक्तात अडथळा निर्माण झाल्यानंतर जे ‘सोडियम थर्टीन’ नावाचं ‘आयसोटोप’ लागतं त्यावर देखील ही संस्था काम करते. या संस्थेने नुकतीच तांदळामधील गोल्डन जात देखील शोधून काढली आहे. ज्यात व्हिटॅमिन’A’ घटक असल्याचे पाहायला मिळते. जगात कुठेही गेलात तरी तांदळामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन’बी’ हाच घटक पाहायला मिळेल. मात्र या संस्थेने तांदळाची सोनेरी जात शोधून काढत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आणि ही सगळी देन टाटा समूहाची आहे.

‘जलविद्युत प्रकल्प’ उभारण्यासाठी लागणारे पाईप्स, साहित्य जर्मनीहून आणत, टाटा समूहाने ‘खापोली’त भारतातील पहिला ‘जलविद्युत प्रकल्प’ उभा करत ऐतिहासिक कामगिरी केली. मुंबईमध्ये उभारण्यात आलेल्या ‘टाटा मेमरिअल हॉस्पिटल’मध्ये रक्ताच्या कॅन्सरवर मोफत इलाज केला जातो. अशी अनेक ऐतिहासिक कामगिरी टाटा समूहाने केली असून, भारताच्या विकासात टाटा समूहाचा सिंहाचा वाटा असल्याचे पाहिला मिळते. Free treatment for leukemia at Tata Memorial Hospital.

हेही वाचा- इंटरनेट नसेल तरीदेखील तुम्ही वापरू शकता WhatsApp वाचा कसे..

टाटांची आता शेतकऱ्यांसाठी खास योजना! कांदा साठवणुक करण्यासाठी आता ही संकल्पना राबवणार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.