Right age to get married: लग्न करणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींना लग्नाचे हे योग्य वय माहीत असायलाच हवे, अन्यथा..

0

Right age to get married: प्रत्येकाच्या आयुष्यातला (Life) खूप महत्त्वाचा टप्पा असतो. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला लग्न (married) या संकल्पनेतून जावं लागतं. तरुण-तरुणींचे वय जसजसं वाढत, तस तसं दोघांच्याही मनात लग्नाविषयी आपापल्या कल्पना तयार होतात. दोघांच्याही मनात याविषयी खूप मोठी उत्सुकता असते. मात्र लग्न करणार प्रत्येकाला लग्नाचे योग्य माहीत नसल्याचं पाहायला मिळते.

कायद्यानुसार मुलगा आणि मुलगी या दोघांचेही वय निश्चित करण्यात आलं आहे. मात्र लग्नाचे हे योग्य वय नाही. तुम्हाला हे वाचून आचार्य वाटेल. मात्र हे वास्तव आहे. खरंतर प्रत्येकाचे लग्नाचे वय वेगवेगळे आहे. होय तुम्ही बरोबर वाचले आहे. लग्नाचे वय केवळ आकड्यांच्या आधारवर ठरवणे योग्य नाही. लग्नाचे वय दोघांच्याही बौद्धिक क्षमतेवर अवलंबून आहे. जाणून घेऊया याविषयी सविस्तर..

आजही आपल्याकडे मुलगी 18, 19 आणि मुलगा 21, 22 वर्षाचा झाल्यानंतर लग्न केलं जातं. वयात लग्न होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. खासकरून खेडेगावांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. मात्र या वयामध्ये लग्न केल्यानंतर, अनेक समस्या निर्माण होतात. जोपर्यंत तुम्हाला लग्नाचे योग्य वय काय आहे? हे माहीत नाही, तोपर्यंत लग्न करण्याचा विचार म्हणजे मूर्खपणा आहे.

लग्नाचे विशेष असे कोणतेही वय नाही. मुलगा आणि मुलगी या दोघांची बौद्धिक क्षमता लग्न करण्यासाठी फार आवश्यक आहे बौद्धिक क्षमतेबरोबर आर्थिक, शारीरिक, मानसिक या चार पातळ्यांवर वर आणि वधू फिट बसत असतील, तर लग्न करण्यास हरकत नाही. केवळ वयाचा विचार करून लग्न करण्याचा निर्णय घेतल्यास, भविष्यात प्रचंड समस्या निर्माण होतात.

अमेरिकेत केलेले एका सर्वेनुसार 28 ते 32 हे लग्न करण्याचे योग्य वय मानले गेले आहे. आपल्याकडे मात्र बहुतांशी लग्न हे वीस ते पंचवीस या दरम्यान केले जाते. मात्र हे दोन्ही वय योग्य नसून, लग्नाचे योग्य दोघांचीही आर्थिक परिस्थिती बौद्धिक क्षमता शारीरिक आणि मानसिक स्थिती यावर ठरते. जर या सगळ्या गोष्टींची सांगड बसत असेल तरच लग्न करण्यास हरकत नाही.

अमेरिकेत केलेल्या सर्वेनुसार 28 ते 32 हे लग्न करण्याचे योग्य वय का आहे, याविषयी अधिक सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. 28 ते 32 या वयात माणूस अधिक परिपक्व असतो. या वयात शिक्षण पूर्ण होऊन नोकरी किंवा व्यवसायात पाऊल ठेवलेलं असतं. साहजिक आर्थिक परिस्थितीमध्ये तो सक्षम उभा असतो. या शिवाय जीवनात अनेक अनुभव देखील आलेले असतात. नात्याचे महत्व देखील समजू लागलेले असते. आणि म्हणून लग्नाचे हे योग्य वय असल्याचं सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा  IND vs ENG 1St test: ओली पोपच्या वादळात भारत उध्वस्त; त्या कारणामुळे इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर..

NMMC Recruitment 2024: या उमेदवारांसाठी 110 जागांची भरती; जाणून घ्या डिटेल्स आणि असा करा अर्ज..

Mumbai Customs Recruitment 2024: दहावी पास उमेदवारांसाठी या विभागात मेगा भरती; 63 हजार पगार, वाचा सविस्तर..

Abdul Kalam on success Mantra: डॉ.अब्दुल कलाम यांचे चार गुरूमंत्र पाळा; अन्यथा संघर्ष, मेहनत करूनही मिळणार नाही यश..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.