NMMC Recruitment 2024: या उमेदवारांसाठी 110 जागांची भरती; जाणून घ्या डिटेल्स आणि असा करा अर्ज..

0

NMMC Recruitment 2024: नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी ११० रिक्त जागा भरण्यात येणार असून यासंदर्भातली अधीसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना एक फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. जाणून घेऊया, या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर अपडेट..

रिक्त पदे आणि शैक्षणीक पात्रता

वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण 55 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी संपादन केलेला असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी देखील असणे आवश्यक आहे. खाजगी किंवा शासकीय संबंधित विभागांमध्ये उमेदवाराला अनुभव असणे देखील आवश्यक आहे.

स्टाफ नर्स या पदासाठी एकूण 49 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बीएससी झालेल्या उमेदवारांना देखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवाराने महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी केलेली असणे अनिवार्य आहे.

स्टाफ नर्स पुरुष, या पदासाठी एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जनरल नर्सिंग डिप्लोमा, बीएससी इत्यादी शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. घराकडे महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा/ परीक्षा फी 

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी उमेदवाराला वयाची अट देण्यात आली आहे. 38 ते 70 वर्षा दरम्यान असणारे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार आहेत. सरकारी नियमानुसार, कॅटेगिरीच्या उमेदवारांना वयोमर्यादित सूट दिली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

पगार/ नोकरी ठिकाण

वैद्यकीय अधिकारी या पदासाठी निवड केलेल्या उमेदवारांना दरमहा साठ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. स्टाफ नर्स स्त्री या पदासाठी ४०००० रुपये दरमहा पगार दिला जाईल. स्टाफ नर्स पुरुष या पदासाठी वीस हजार रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. निवड केलेल्या उमेदवारांना नवी मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.

निवड पद्धत

अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे मुलाखतीची तारीख 1 फेब्रुवारी 2024 निश्चित करण्यात आली आहे. मुलाखतीचे ठिकाण Medical Health Officer, Health Department, 3rd Floor, Namumpa Headquarters, Plot no. 1, Sec. 15A, Near Kille Gavthan, CBD Belapur, Navi Mumbai-400614

यावर क्लिक करून भरतीची जाहिरात पाहू शकता..

Rohit Sharma on Rahane Pujara: रहाणे पुजाराचे टेस्ट करिअर संपुष्टात आले का? रोहित शर्माच्या उत्तराने खळबळ..

Mumbai Customs Recruitment 2024: दहावी पास उमेदवारांसाठी या विभागात मेगा भरती; 63 हजार पगार, वाचा सविस्तर..

Rohit Sharma Trade window: असा होणार रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्स संघात ट्रेड; नाईलाजाने अखेर मुंबई इंडियन्सचाही हिरवा कंदील..

Abdul Kalam on success Mantra: डॉ.अब्दुल कलाम यांचे चार गुरूमंत्र पाळा; अन्यथा संघर्ष, मेहनत करूनही मिळणार नाही यश..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.