Abdul Kalam on success Mantra: डॉ.अब्दुल कलाम यांचे चार गुरूमंत्र पाळा; अन्यथा संघर्ष, मेहनत करूनही मिळणार नाही यश..

0

Abdul Kalam on success Mantra: भारताचे मिसाईल मॅन (missile man) म्हणून अब्दुल कलाम (A.P.J.Abdul Kalam) यांना ओळखलं जातं. भारतरत्न अब्दुल कलाम केवळ भारतीयांसाठीच नाही, तर जगासाठी देखील आदर्श आणि प्रेरणादायी आहेत. संघर्षातून त्यांनी मिळवलेले यश कल्पनेपलीकडचं आहे. अब्दुल कलाम यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. आयुष्यात यश कसे मिळवायचे याविषयी त्याचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. (Abdul Kalam on success mantra)

आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं. मात्र प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होईलच असं नाही. अनेक जण अफाट कष्ट करून देखील जीवनात सक्सेसफुल होत नाही. गुरूमंत्राशिवाय जीवनात यशस्वी होणे अवघड आहे. मनुष्याचा सर्वात मोठा गुरू अनुभव असतो. असं अनेकदा बोललं जातं. मात्र थोरांनी केलेल्या मार्गदर्शनावर आपण चाललो, तर निश्चित यश मिळू शकते. जाणून घेऊया डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या चार यशाच्या मार्गदर्शक तत्वाविषयी..

अब्दुल कलाम यांचा जीवनपट माहीत नसणारा माणूस या जगात शोधावा लागेल. प्रत्येकाच्या आयुष्यात यश आणि अपयश या दोन गोष्टी सतत येतात. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रचंड मेहनत करून अनेकदा अपयश देखील येते. याचा अनुभव देखील अनेकांना आला असेल. मात्र अपयश येण्याला केवळ स्वतः तो व्यक्तीच जबाबदार असतो.

जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी प्रचंड तपस्या, मेहनत, सातत्य, संघर्ष करावा लागतो. एखादी गोष्ट मिळवण्यात माणसाला अपयश आले, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न कमी पडले, असं समजावं. अब्दुल कलाम यांनी देखील यश संपादन करण्यासाठी याच गोष्टींना प्राधान्य दिलं आहे. यश मिळवण्यासाठी जगात कोणताही शॉर्टकट नाही.

अब्दुल कलाम सांगतात, कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत, समर्पण, संयम आणि चिकाटी या चार मंत्र फार महत्वाचे आहेत. जोपर्यंत तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला मेहनत, समर्पण, संयम, चिकाटी या गोष्टींना बाजूला करता येणार नाही. चार मूलमंत्रापैकी एक जरी मूलमंत्र तुम्ही बाजूला ठेवला, आणि यश संपादन करायला निघाला, तर तुम्ही खाली हाताने परत याल.

हे देखील वाचा Flipkart Sale : Motorola, Vivo स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर; जाणून घ्या Flipkart वर सुरू असलेल्या ऑफर विषयी..

Anil Kapoor on fitness secret: अनिल कपूरने तरुण आणि फिट दिसण्याचे रहस्य केले उघड; जाणून तुम्हीही व्हाल चकित..

Rohit Sharma on retirement: सकाळी उठल्यावर माझ्या मनात..”निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं धडकी भरवणारं उत्तर..

Rohit Sharma on Rahane Pujara: रहाणे पुजाराचे टेस्ट करिअर संपुष्टात आले का? रोहित शर्माच्या उत्तराने खळबळ..

Love tips: समोरून लाईन मिळते आहे, की नाही हे कसं ओळखाल? हे इशारे मिळत असतील, तर वेळ न घालवता बिंदास करा प्रपोज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.