Anil Kapoor on fitness secret: अनिल कपूरने तरुण आणि फिट दिसण्याचे रहस्य केले उघड; जाणून तुम्हीही व्हाल चकित..

0

Anil Kapoor on fitness secret: धावपळीच्या जीवनात फिट (fit) राहणं प्रचंड आव्हानात्मक आहे. कामाचा व्याप धावपळ आणि वेळेवर अन्न मिळत नसल्याने, अनेकांपुढे आरोग्याच्या समस्या उद्भवल्याचे पाहायला मिळते. कामामुळे व्यायाम करण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. साहजिकच या सगळ्या गोष्टींचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र आजही असंख्य वयस्कर लोक अशी आहेत, जे फिटनेसच्या बाबतीत तरुणांना देखील लाजवतील.

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये (bollywood industry) असंख्य कलाकारांनी आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना चकित केले आहे. फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत मलायका (Malaika Arora) अरोराचे नाव नेहमी घेतलं जातं. पन्नाशीत देखील मलायका अरोरा आजही विशीतल्या मुली सारखी दिसते. मात्र मलायका अरोरा पेक्षा अधिक चर्चा अनिल कपूरच्या (Anil Kapoor) तारुण्याची होते. एका मुलाखतीत अनिल कपूरने तरुण दिसण्याचे रहस्य उघड केलं आहे.

अनिल कपूर सध्या 67 वर्षाचे आहेत. होय तुम्ही बरोबर वाचलंय. अनेकांना अनिल कपूर यांच्या वयाचा आकडा वाचून धक्का बसेल. मात्र हे वास्तव आहे. गेली अनेक दशके अनिल कपूर आहे असेच दिसतात. अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर तेज कमी झाले नाही. त्यांची शरीरयष्टी अगदी वर्षानुवर्षे त्याच पद्धतीची असल्याचं पाहायला मिळतं. अनेकांना अनिल कपूर स्वतःला कसं फिट ठेवतात. त्याच्या तरुण दिसण्याचे रहस्य काय आहे? याविषयी अनेकांना कुतुहल असल्याचे पाहायला मिळते. आता मात्र त्यांनी स्वतःच याविषयी खुलासा केला आहे.

अनिल कपूर यांनी नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी तरुण दिसण्यावर आणि स्वतः फिट असण्यावर भाष्य केलं. अनिल कपूर म्हणतात, माझं साउथ इंडियन फुडवरती (South Indian food) प्रचंड प्रेम आहे. मी नेहमी इडली, डोसा, चटणी सांबर लोणचं असे पदार्थ खात असतो. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असते. पचायलाही सोपं जातं. कदाचित यामुळे मी तरुण दिसत असेल.

पुढे बोलताना अनिल कपूर म्हणतात, मी दक्षिणात्य पदार्थ मोठ्या प्रमाणात खातो. मात्र मी कधीच धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन करत नाही. मी गोड पदार्थ आणि जंक फूड पासून देखील दोन हात लांब राहतो. मी प्रचंड फुडी आहे. मी दिवसातून पाच-सहा वेळा जेवण करतो. मात्र कमी कॅलरीज असणारे फूड मी खाण्यास प्राधान्य देतो. आणि खूप कमी देखील खातो. दुपारच्या जेवणामध्ये मी ब्रोकोली ज्यूसचे सेवन करतो. संध्याकाळी मी केवळ सॅलड आणि इतर प्रकारचे सूप पिने पसंत करतो, असं अनिल कपूर यांनी सांगितले.

हे देखील वाचा Rohit Sharma on retirement: सकाळी उठल्यावर माझ्या मनात..,” निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं धडकी भरवणारं उत्तर..

Love tips: समोरून लाईन मिळते आहे, की नाही हे कसं ओळखाल? हे इशारे मिळत असतील, तर वेळ न घालवता बिंदास करा प्रपोज..

Rohit Sharma on Rahane Pujara: रहाणे पुजाराचे टेस्ट करिअर संपुष्टात आले का? रोहित शर्माच्या उत्तराने खळबळ..

Love fact: ..म्हणून मुली करत नाहीत स्वतःहून प्रपोज; प्रपोज केल्यानंतर मुलींना काय वाटतं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.