Love tips: समोरून लाईन मिळते आहे, की नाही हे कसं ओळखाल? हे इशारे मिळत असतील, तर वेळ न घालवता बिंदास करा प्रपोज..

0

Love tips: माणूस (men) प्रेमात पडल्यावर त्याला संपूर्ण जग सुंदर वाटू लागतं. प्रेमात पडलेला माणूस आपल्याच दुनियेत जगत असतो. अनेकांना पहिल्याच नजरेत प्रेमात पडल्याचा अनुभव अनेकदा आला असेल. पहिल्या नजरेतलं प्रेम हे खूप अविस्मरणीय असतं. मात्र त्याचबरोबर आव्हानात्मक देखील असतं. पहिल्या नजरेत आपल्याला प्रेम होतं, परंतु समोरचा व्यक्ती आपल्याला रिस्पॉन्स देतोय, की नाही, त्यालाही आपण आवडतोय की नाही, हे बऱ्याच जणांना कळत नाही.

मुलांपेक्षा मुलींचा सेंस अधिक उत्तम असतो मुलांच्या अगोदर मुलींना बऱ्याच गोष्टीची उकल होते. समोरचा व्यक्ती आपल्याला कोणत्या भावनेतून बघत आहे, हे देखील मुलींना वेळीच समजते. मुलांना मात्र मुलींच्या भावना समजायला उशीर लागतो. अनेकदा मुलांचा अंदाज देखील चुकतो. त्यामुळे एखादी मुलगी आपल्याकडे पाहत असेल, तर ती आपल्याला रिस्पॉन्स देत आहे का?आपल्यावर प्रेम करत आहे का? हे समजून घेऊनच प्रपोज करणं अधिक सोयीस्कर ठरते. अन्यथा समस्या देखील निर्माण होऊ शकते.

समोरचा व्यक्ती तुम्हाला रिस्पॉन्स देत असेल तर काही इशारे देखील करतो, जाणून घेऊया याविषयी सविस्तर..

एकमेकांसोबत संवाद न साधता केवळ पहिल्या नजरेत, एकमेकांकडे पाहून देखील प्रेम होते. तुम्हाला देखील असे अनुभव आले असतील. अनेकांना समोरचा व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो आहे की नाही, आपल्याला रिस्पॉन्स देतोय की नाही, हे समजत नाही. त्यामुळे तुम्हाला इशाऱ्याची भाषा माहीत असणं, अवगत असणं आवश्यक आहे.

जर तुम्हाला देखील पहिल्या नजरेत प्रेम झालं असेल, आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला लाईक करतो आहे की नाही, तुमच्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे की नाही, हे पाहायचं असेल तर तो तुमच्याकडे पाहून स्मित हास्य करेल. समोरचा व्यक्ती तुमच्याकडे पाहून स्मित हास्य करत असेल, तर त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे, असा त्याचा अर्थ होतो. समोरचा व्यक्ती तुमच्याकडे पाहताना आपली केस सावरत असेल, तर समजून जा समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात पडला आहे.

जर समोरचा तुमच्या प्रेमात असेल, किंवा तुम्हाला लाईक करत असेल तर, तो बोलताना त्याच्या डोळ्यांमध्ये वेगळीच चमक पाहायला मिळेल. समोरचा व्यक्ती जर तुमच्या पेहरावाचे कौतुक करत असेल, तर समजून जा तुम्ही त्या व्यक्तीला आवडू लागला आहात. समोरचा व्यक्ती तुमच्या प्रेमात असेल, तर आपल्या खाजगी गोष्टी देखील शेअर करताना तो संकोच ठेवत नाही. तुमच्या बाबतीत हा प्रकार घडत असेल, तर वेळ न घालवता तुम्ही प्रपोज करू शकता.

हे देखील वाचा  WPL 2024: आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार; BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक..

Love fact: ..म्हणून मुली करत नाहीत स्वतःहून प्रपोज; प्रपोज केल्यानंतर मुलींना काय वाटतं?

Chanakya Niti on age: त्या कारणामुळे मनुष्य होता लवकर म्हतारा; रोमान्स आणि वयाचा आहे थेट संबंध..

Sania Mirza Mohammed Shami: मोहम्मद शमी सानिया मिर्झा करणार लग्न; त्या प्रस्तावामुळे भांडाफोड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.