Sania Mirza Mohammed Shami: मोहम्मद शमी सानिया मिर्झा करणार लग्न; त्या प्रस्तावामुळे भांडाफोड..

0

Sania Mirza Mohammed Shami: गेल्या दीड वर्षापासून सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि (Shoaib Malik) मलिक या दोघांचा घटस्फोटाच्या चर्चा सातत्याने होत होत्या. मात्र तरीदेखील दोघांचा घटस्फोट हा अनेकांसाठी मोठा धक्का होता. अनेकांचा विरोध झुगारून सीमारेषा पार जाऊन या दोघांनी लग्न केलं होते. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकू करू शकला नाही. 2010 मध्ये दोघांनी लग्न केलं. आणि 2023 मध्ये दोघेही वेगळे झाले.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे दोघे केवळ वेगळेच झाले नाहीत, तर मलिकने काही दिवसांपूर्वी आपले तिसरं लग्न देखील साकारलं. सानिया मिर्झाने देखील मी स्वतःहून घटस्फोट घेतला असल्याचं जाहीर देखील केलं. इतकंच नाही तर, शोएब मलिकला नवीन इनिंगसाठी शुभेच्छा देखील दिल्या. शोएब मलिक नंतर आता सानिया मिर्झा लग्न करणार की नाही, याविषयी तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याचा देखील घटस्फोट झाला आहे. शमीच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप देखील केले होते. मात्र या सगळ्यांना तोंड देत अखेर, मोहम्मद शमीने आलेला परिस्थितीचा सामना करत अनेकांना नवा आदर्श घालून दिला. सोशल मीडियावर मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा हे दोघे एकत्र येऊन लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी या दोघांकडून मात्र लग्नाविषयी कोणतीही अपडेट देण्यात आली नाही. मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा दोघेही चांगले मित्र आहेत. मात्र दोघे लग्न करणार आहेत, की नाही याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर मात्र दोघांचेही चाहते दोघांनी एकत्र येऊन लग्न करण्यासंदर्भात प्रचंड उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांच्या घटस्फोटाचे कारण सना जावेद (sana Javed) असल्याचं बोललं जातं. सना जावेद आणि शोएब मलिक एका टीव्ही शो निमित्त एकत्र आले होते. दोघांच्या केमिस्ट्रीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सध्या तुफान वायरल झाला आहे. या दोघांची वाढती जवळीकता हेच घटस्फोटाचे कारण असल्याचं सांगितलं जातं. रिपोर्टनुसार सानियाने शोएब मलिकला रंगेहाथ पकडण्याचं देखील बोललं जातं.

हे देखील वाचा  Sania Mirza: सानिया मिर्झासोबत लग्न का केलंस? शाहरुख खानच्या प्रश्नावर शोएब मलिकचे धक्कादायक उत्तर..

IND vs ENG 1St test Live: बेन स्टोक्सच्या मास्टर प्लॅनमुळे भारतीय गोटात खळबळ..

Women interest men: या पुरुषांची महिलांवर असते कायम जादू; महिलांना आवडणाऱ्या पुरुषांची यादी धक्कादायक..

ICC Awards 2023: ICICI कडून 2023 वनडे टीमची घोषणा; संघात सहा भारतीय पण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.