Sania Mirza: सानिया मिर्झासोबत लग्न का केलंस? शाहरुख खानच्या प्रश्नावर शोएब मलिकचे धक्कादायक उत्तर..

0

Sania Mirza: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तान क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या प्रेम प्रकरण जगभर गाजलं. पाकिस्तान आणि भारताचे संबंध ठीक नसतानाही सानिया मिर्झाने पाकिस्तान क्रिकेटर सोबत आपल्या प्रेमाचा धागा बांधला.सानिया केवळ मलिकच्या प्रेमातच पडली नाही, तर देशातल्या नागरिकांचा विरोध झुगारून तिने विवाह करण्याचा करिष्मा देखील केला. 2010 मध्ये या दोघांचे लग्न झाले या लग्नाला कडाडून विरोध झाला. सानियाला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं.

प्रेमाला सीमा नसते, हे उदाहरण सहित सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांनी दाखवून दिलं. दोन्ही देशातल्या नागरिकांचा विरोध असताना देखील या दोघांनी यशस्वीरित्या संसार केला. मात्र हा संसार दीर्घ काळ टिकू शकला नाही. 2010 मध्ये या दोघांनी लग्न केलं हे लग्न आता अखेर 2023 मध्ये संपुष्टात आलं आहे. तेरा वर्ष दोघांनी सुखाचा संसार केल्यानंतर, अखेर दोघेही वेगळं झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सानियाने घटस्फोट घेतल्याची देखील माहिती दिली आहे.

मी माझ्या सहमतीने घटस्फोट घेतला असल्याचं पोस्टच्या माध्यमातून तिने म्हटलं. या विषयावर कोणीही काहीही अंदाज लावू नये. शोएबने नवीन लग्न करण्याच्या निर्णयाचा मी सन्मान करते. त्याला भविष्यासाठी आम्ही शुभेच्छा देखील देत असल्याचं सानियाने म्हटले. मात्र आता सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शाहरुख खान (shahrukh khan) मध्यस्ती आहे.

टीव्ही शो दरम्यान शाहरुख खान सानिया मिर्झा शोएब मलिक एकत्र आले होते. या तिघांनी एकमेकांसोबत संवाद साधला. या संवादामध्ये शाहरुख खान (shahrukh khan) सानियाला विचारतो, शोएब मलिकमध्ये तू काय पाहिले? क्रिकेट ठीकठाक खेळतो, दिसायलाही सुंदर आहे. पण अशी कोणती गोष्ट आहे, ज्यामुळे तू याच्याशी लग्न केलं. यावर सानिया म्हणते, तो खूप लाजाळू आहे. मी यांच्यात खूप काही पाहिलं आहे. तुम्ही फक्त याला बोलायला शिकवा.

सानियाच्या उत्तराने उपस्थित प्रेक्षकांचा एकच हशा पिकला. शाहरुख खानने तोच प्रश्न शोएब मलिकला विचारला. लग्न करताना तू सानियामध्ये काय पाहिलेस. शाहरुख खानच्या या प्रश्नावर बोलताना शोएब मलिकने आश्चर्यकारक उत्तर दिले. शोएब म्हणाला, सानियामध्ये काय स्पेशल आहे, हे कळायच्या आतमध्येच आमचं लग्न झालं, त्यामुळे मला काही सांगता येणार नाही.

शाहरुख खान सानिया मिर्झा, शोएब मलिक या तिघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी याचा संबंध शोएब मलिकच्या नीतिमत्तेशी जोडला जात आहे. शोएब मलिकचे उत्तर सानियाचा अपमान करणारं होतं असं आता बोलले जात आहे. काही युजर्स मात्र शोएबचे उत्तर गमतीशीर असून याकडे केवळ याच भावनेतून पाहायला हवं असही म्हणत आहेत.

हे देखील वाचा  Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

IND vs ENG 1St test Live: बेन स्टोक्सच्या मास्टर प्लॅनमुळे भारतीय गोटात खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.