IND vs ENG 1St test Live: बेन स्टोक्सच्या मास्टर प्लॅनमुळे भारतीय गोटात खळबळ..

0

IND vs ENG 1St test Live: उद्यापासून भारत आणि इंग्लंड (ind vs ENG) यांच्यामध्ये खेळवल्या जाणाऱ्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र खेळपट्टी विषयी आता जोरदार चर्चा रंगली असून, इंग्लंड संघाने देखील भारतीय संघाला आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी नवा प्लॅन घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहलीने माघार घेतली आहे. वैयक्तिक कारण देत, विराट कोहली पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार नाही. विराट नसल्यामुळे भारतीय फलंदाजीची मदार सलामीवीर आणि केएल राहुल (kl Rahul) यांच्यावरच असणार आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल वगळता भारतीय प्रमुख फलंदाजांना कसोटी खेळण्याचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे पहिला कसोटी सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

गेल्या बारा वर्षात इंग्लंडचा संघ भारतामध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेला नाही. मात्र इंग्लंडचा संघ यावेळी तयारीशी मैदानात उतरला आहे. त्यामुळे या कसोटी मलिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने आपली प्लेइंग11 जाहीर केली आहे. भारतीय फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तब्बल चार फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे.

भारतीय खेळपट्ट्या स्पिन गोलंदाजांना साथ देणाऱ्या आहेत. विदेशी खेळाडूंना भारतीय खेळपट्ट्यावर स्पिन गोलंदाजांचा सामना करणं मोठं आव्हान मानलं जातं. भारतीय खेळपट्ट्यांवर अनेक विदेशी संघांनी नीचांकी धावसंख्येचा रेकॉर्ड नोंदवला आहे. परंतु दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून भारतीय फलंदाज देखील स्पिन गोलंदाजांना सामना आत्मविश्वासाने करताना पाहायला मिळत नाहीत. आणि म्हणून भारताचे औषध इंग्लंडने भारताविरुद्धच वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने आपल्या तब्बल चार स्पिन गोलंदाजांना स्थान दिले आहे. इंग्लंडने केवळ एकच जलदगती गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. टॉम हार्टली, ऑली पोप, बेन फोक्स, रेहान अहमद, जॅक लीच या चार स्पिन गोलंदाजांना खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय फलंदाजांना जाळ्यात अडकवण्यासाठी इंग्लंडने केलेला हा नवा खेळ किती यशस्वी ठरतो, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

हे देखील वाचा 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.