ICC Awards 2023: ICICI कडून 2023 वनडे टीमची घोषणा; संघात सहा भारतीय पण..

0

ICC Awards 2023: दहा वर्षापासून भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नसली तरी, भारतीय संघाचा वर्ल्ड क्रिकेटवर दबदबा मात्र कायम आहे. आयसीसीने वन डे टीम ऑफ दी इयर 2023 (ICC one day team of the year 2023) च्या संघाची घोषणा केली आहे. आयसीसीने (ICC) घोषणा करण्यात आलेल्या संघामध्ये तब्बल सहा भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, विश्वचषकामध्ये पराभव होऊन देखील रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधार बनवण्यात आलं आहे.

त्या-त्या फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना एकत्रित करून आयसीसी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारासाठी वेगवेगळा संघ निवडते. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकामध्ये भारतीय संघाची कामगिरी दमदार राहिली. वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने लगातार 10 सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला. 2023 च्या विश्वचषकात भारतीय संघ इतर संघाच्या तुलनेत सर्वाधिक समतोल आणि तुल्यबळ वाटत होता. मात्र लडखडत फायनलमध्ये प्रवेश केलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला धूळ चारली. आणि पाचव्यांदा विश्वचषक आपल्या नावावर कोरला.

ऑस्ट्रेलिया संघाने 2023 चा एकदिवसीय विश्वचषक असला तरी आयसीसीने बनवण्यात आलेल्या वनडे टीम ऑफ दी इयर 2023 च्या संघात मात्र फारसी संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाच्या दोनच खेळाडूंना आयसीसीच्या संघात संधी मिळाली आहे. दुखापतीमुळे ट्रॅव्हिस हेडला केवळ शेवटचे सहा सामने खेळण्याचे संधी मिळाली. मात्र सहाही सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारतीय संघाकडून विराट कोहली (Virat kohli) दमदार कामगिरी करताना २०२३ च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या. मात्र तरी देखील विराट कोहलीला आयसीसीने तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज निवडला नाही. विराट ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर ट्रॅव्हिस हेडला संधी देण्यात आली. चौथ्या क्रमांकावर मात्र विराट कोहलीला स्थान देण्यात आले आहे. सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे.

पाचव्या क्रमांकावर न्युझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेलला संधी दिली आहे. सहाव्या क्रमांकावर क्लासनला संधी देण्यात आली आहे. सातव्या क्रमांकावर मार्को जॅन्सनला संधी देण्यात आली आहे. (Marco Jansen) आठव्या क्रमांकावर लेग स्पिनर अडम झम्पा, नवव्या स्थानावर मोहम्मद सिराज, दहाव्या क्रमांकावर कुलदीप यादव, आणि अकराव्या क्रमांकावर मोहम्मद शमी.

इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन संघातील एकही खेळाडूला आयसीसीच्या संघात स्थान मिळवता आले नाही. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर, केएल राहुल, जसप्रीत बुमराह या तिघांना 2023 मध्ये फारसे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. तिघांनीही विश्वचष का दमदार कामगिरी केली मात्र आयसीसीने बनवलेला वनडे संघ 2023 मध्ये एकूण कामगिरी केलेली खेळाडूंसह बनवला आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

Chanakya Niti on age: त्या कारणामुळे मनुष्य होता लवकर म्हतारा; रोमान्स आणि वयाचा आहे थेट संबंध..

Acharya Chanakya thought: काहीही झालं तरी या दोन गोष्टी कोणालाही सांगू नका; तरच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.