Love fact: ..म्हणून मुली करत नाहीत स्वतःहून प्रपोज; प्रपोज केल्यानंतर मुलींना काय वाटतं?

0

Love fact: मुलगा असो की मुलगी प्रत्येकाला आपल्याला देखील गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असावा असं वाटत असतं. अलीकडच्या काळात बॉयफ्रेंड, (boyfriend) गर्लफ्रेंड (girlfriend) निवडताना दोघेही पुढाकार घेताना पाहायला मिळतात. अनेकदा मुली देखील प्रपोज करताना तुम्ही एकल असेल. मात्र बहुतांशी वेळा मुलगी कधीच मुलाला प्रपोज करत नाही, अशी माहिती सर्व्हेतून समोर आली आहे.

मुलगी स्वतःहून मुलांना प्रपोज का करत नाही, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. सोबतच मुलाने प्रपोज केल्यानंतर, तिला काय वाटतं? याविषयी अनेकांना जाणून घ्यायचं असतं. खरंतर अलीकडे एकमेकांना प्रपोज करणं खूप सोपं झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण वेळ न घालवता वेळेत प्रपोज देखील करतात. मात्र प्रपोज केल्यानंतर, मुलगी नक्की काय विचार करते? मुली स्वतःहून का प्रपोज करत नाहीत? या प्रश्नाकडे अलीकडे कोणी फारसं लक्ष देताना दिसत नाही. जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

बहुतांशी रिलेशनशिपमध्ये सर्वप्रथम मुलगा पुढाकार घेतो. प्रपोज करताना नेहमी मुलगा मुलीला विचारतो. मुलीला एखादा मुलगा आवडत असला तरी ती स्वतःहून प्रपोज करत नाही. यामागे अनेक कारणे आहेत. मात्र सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, मुलीने स्वतःहून प्रपोज केला आणि समोरून नकार मिळाला, तर मुलींना प्रचंड वेदना होतात. आणि म्हणून मुली स्वतःहून प्रपोज करणं टाळतात.

स्वतःहून प्रपोज न करण्याचं दुसरे कारण म्हणजे, मुलींमध्ये प्रिन्सेस भावना असतात. त्यांना नेहमी वाटतं, आपल्याला स्वतःहून प्रपोज करायला हवं. जर आपण स्वतःहून प्रपोज केलं, तर लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतील असा देखील मुलींचा समज असतो. जर आपण स्वतःहून प्रपोज केले, तर लोक आपल्याला वाईट नजरेने पाहतील. या विचारामुळे मुली स्वतःहून प्रपोज करत नाहीत. त्या नेहमी मुलं कधी प्रपोज करतात, याचाच विचार करतात.

मुली नेहमी योग्य जोडीदाराची वाट पाहत असतात. मात्र त्या प्रचंड कन्फ्युज देखील असतात. आपल्याला कोणता जोडीदार योग्य आहे, हा निर्णय आपण घेतला आणि नंतर हा निर्णय चुकला तर काय होईल? या भीतीमुळे मुली नेहमी मुलं कधी प्रपोज करतात, याचीच वाट पाहत असतात. मुलांनी प्रपोज केल्यानंतर मुली प्रचंड आनंदी होतात. मात्र बहुतांशी वेळा लगेच होकार देणं टाळतात. मुली नेहमी वेळ घेऊन विचार करून निर्णय घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा

WPL 2024: आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार; BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक..

IND vs ENG 1St test Live: बेन स्टोक्सच्या मास्टर प्लॅनमुळे भारतीय गोटात खळबळ..

Sania Mirza Mohammed Shami: मोहम्मद शमी सानिया मिर्झा करणार लग्न; त्या प्रस्तावामुळे भांडाफोड..

Sania Mirza: सानिया मिर्झासोबत लग्न का केलंस? शाहरुख खानच्या प्रश्नावर शोएब मलिकचे धक्कादायक उत्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.