WPL 2024: आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार; BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक..

0

WPL 2024: आयपीएल (IPL) केवळ भारतातच नाही, तर जगभरात प्रचंड लोकप्रिय t-20 लिग म्हणून उदयास आले आहे. आयपीएलची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन बीसीसीआयने (BCCI) महिलांसाठी देखील टी-ट्वेंटी लीगचे आयोजन केले. आयपीएलच्या धर्तीवर वुमन प्रीमियर लीग म्हणून (wpl) सुरू केलेल्या टी ट्वेंटी लिगला देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. अनेक क्रिकेट चाहते देखील वूमन प्रीमियर लीगचा आनंद घेताना पाहायला मिळतात.

नुकतेच बीसीसीआय कडून वुमन प्रीमियर लिगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (mumbai Indians and delhi capitals) यांच्या सामान्यांपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. 23 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीमध्ये वूमन प्रीमियर लिगचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर या स्पर्धेचा अंतिम सामना 7:30 वाजता खेळवण्यात येणार आहे.

वूमन प्रीमियर लीग स्पर्धेचा हा दुसरा सीजन असून, पहिल्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती. पुरुषांप्रमाणे मुंबई इंडियन्स संघाचा महिलांच्या आयपीएलमध्ये दबदबा पाहायला मिळाला होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पहिल्या सीजनमध्ये वुमन प्रीमियर लीगची ट्रॉफी जिंकली होती. पुन्हा एकदा तिच्याच खांद्यावर मुंबई इंडियनने आपल्या संघाची जबाबदारी सोपवली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांनी फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र चुरशीच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. आता पुन्हा एकदा या दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध भिडताना क्रिकेट चाहत्यांना या सीजनमध्ये पाहायला मिळणार आहे.

यावर्षी t20 विश्वचषक आणि लोकसभा निवडणुका आणि आयपीएलही असल्यामुळे आयपीएल स्पर्धा भारतात होणार की विदेशात, याविषयी देखील संभ्रमता आहे. मुंबई इंडियन्स या वर्षी नव्या कॅप्टनसह मैदानात उतरत असल्याने, अनेकांचे लक्ष मुंबई इंडियन्सच्या कामगिरीकडे लागले आहे. हार्दिक पांड्याच्या दुखापती विषयी देखील मोठी संभ्रमता असून, त्यांच्या कमबॅक कडेही अनेकांच्या नजरा आहेत.

हे देखील वाचा  IND vs ENG 1St test Live: बेन स्टोक्सच्या मास्टर प्लॅनमुळे भारतीय गोटात खळबळ..

Sania Mirza Mohammed Shami: मोहम्मद शमी सानिया मिर्झा करणार लग्न; त्या प्रस्तावामुळे भांडाफोड..

Sania Mirza: सानिया मिर्झासोबत लग्न का केलंस? शाहरुख खानच्या प्रश्नावर शोएब मलिकचे धक्कादायक उत्तर..

Women interest men: या पुरुषांची महिलांवर असते कायम जादू; महिलांना आवडणाऱ्या पुरुषांची यादी धक्कादायक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.