Rohit Sharma on Rahane Pujara: रहाणे पुजाराचे टेस्ट करिअर संपुष्टात आले का? रोहित शर्माच्या उत्तराने खळबळ..

0

Rohit Sharma on Rahane Pujara: सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG test series) यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. दुसऱ्या दिवशी केएल राहुलने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पाहुण्यांवर भारताने लीड प्रस्थापित केले आहे. एकीकडे कसोटी मालिका सुरू असली तरी दुसरिकडे रोहित शर्माच्या पत्रकार परिषदेमुळे मात्र पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्माला अजिंक्य रहाणे (ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (cheteshwar Pujara) या दोघांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित शर्माने क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारं उत्तर दिलं आहे. 2021 मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल नंतर अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) हकालपट्टी करण्यात आली. 2023 मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत रहाणेने दमदार कामगिरी केली. आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला पुन्हा कसोटी संघात संधी देण्यात आली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये रहाणेने भारतीय संघाकडून सर्वाधिक यशस्वी फलंदाज म्हणून देखील समोर आला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल नंतर खेळलेल्या कसोटी मालिकेत रहानेला संधी दिली. मात्र चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आलं. मात्र त्या पुढच्या कसोटी मालिकेतून दोघांचीही हक्कालपट्टी करून नवीन खेळाडूंना कसोटी संघात स्थान देण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या एकही मालिकेत दोघांचीही निवड करण्यात आली नाही. साहजिकच त्यामुळे पत्रकारांने रोहित शर्माला या दोघांविषयी प्रश्न विचारला, ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

बॉर्डर-गावस्कर कसोटी (border Gavaskar test series) मालिका दोन्ही वेळेस जिंकण्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा दोघांचाही खूप मोठा वाटा होता. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून विराट कोहलीने (Virat Kohli) माघार घेतली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे किंवा पुकारला संधी मिळेल, असं बोललं जात होतं. मात्र विराट कोहलीच्या जागेवर रजत पाटीदारची (rajat Patidar) निवड करण्यात आली.

साहजिकच त्यामुळे भारतीय टीम मॅनेजमेंटचे लक्ष नवीन खेळाडूंना संधी देण्याकडे असल्याचे स्पष्ट झालं. यावर पत्रकारांनी रोहित शर्माला देखील अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांचे टेस्ट करियर संपुष्टात आलं आहे का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला, अनुभव खेळाडूंचा नेहमी विचार केला जातो. मात्र केवळ अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देत गेलो, तर नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार नाही. अनुभवी खेळाडूंना बाहेर करणं प्रचंड आव्हानात्मक असतं. मात्र कालांतराने या निर्णय प्रक्रियेतून सगळ्यांनाच जावं लागतं.

रोहित शर्माने केलेल्या विधानामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जात आहे. जर नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी अनुभव खेळाडूंना वगळण्यात येत असेल, तर रोहित शर्मा t20 मध्ये कसा काय? अफगाणिस्तान विरुद्ध शतक झळकावले असले तरी, गेल्या तीन वर्षात रोहित शर्माची ती एकमेव इनिंग होती. अशाप्रकारे टीका करताना आता रोहित शर्माला ट्रोल देखील केलं जात आहे. सोबतच रोहितच्या उत्तराने पुजारा आणि रहाणे नाराज झाल्याचं देखील बोललं जात आहे.

हे देखील वाचा Love tips: समोरून लाईन मिळते आहे, की नाही हे कसं ओळखाल? हे इशारे मिळत असतील, तर वेळ न घालवता बिंदास करा प्रपोज..

WPL 2024: आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगणार; BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक..

Love fact: ..म्हणून मुली करत नाहीत स्वतःहून प्रपोज; प्रपोज केल्यानंतर मुलींना काय वाटतं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.