IND vs ENG 1St test: ओली पोपच्या वादळात भारत उध्वस्त; त्या कारणामुळे इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर..

0

IND vs ENG 1St test: भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेली पहिली कसोटी आता रंगतदार अवस्थेत आली आहे. पहिला कसोटी सामना भारत एक डाव राखून जिंकेल, असं वाटत होतं. मात्र इंग्लंडने कमालीचा कमबॅक करत भारताच्या तोंडाला फेस आणला आहे. पराभवाच्या छायेतून इंग्लंड आता ड्रायव्हिंग सीटवर पोहोचला असून, भारतीय संघावर पहिला कसोटी सामना गमावण्याची नामुष्की ओढवली जाण्याची दाट शक्यता आहे. (England tremendous come back after first innings)

पहिल्या डावात इंग्लंड संघाला लवकर बात करण्यात भारतीय गोलंदाजाला यश आले. इंग्लंड संघाला सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून दिली. मात्र भारतीय फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडची मधली फळी पोकरली. आणि इंग्लंडचा संघ 246 धावांत गारद झाला. गोलंदाजाने यशस्वी कामगिरी केल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करत इंग्लंड समोर धावांचा डोंगर उभा केला.

केएल राहुल (kl Rahul) रवींद्र जडेजा (ravindra jadeja) यशस्वी जयस्वालच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 436 धावा करत, तब्बल 190 धावांची आघाडी घेतली. भारताने घेतलेले 190 धावांच्या आघाडीमुळे इंग्लंडचा डावाने पराभव होईल, की काय अशी, शक्यता निर्माण झाली होती. मात्र इंग्लंडच्या फलंदाजाने दमदार कमबॅक करत भारतीय संघाला बॅक फुटवर ढकलले आहे.

खरंतर इंग्लंड संघाची उपकर्णधार ओली पोपने पहिल्या कसोटी सामना भारताच्या हातून हिसकावून घेतला आहे. ओली पोपने (Ollie Pope) तब्बल १९६ धावांची दमदार खेळी करत अखेरपर्यंत इंग्लंड संघाची खिंड लढवली. ओली पोपच्या जोरावर इंग्लंड संघाने 420 धावांचा डोंगर उभा केला. पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी आता भारतीय संघाला 230 धावांची आवश्यकता आहे.

भारतीय संघ चौथी इनिंग खेळणार असल्याने, खेळपट्टीचा खूप मोठा रोल राहणार आहे. इंग्लंड संघाकडे उच्च दर्जाचे स्पिन गोलंदाज नसले, तरी खेळपट्टी स्पिन गोलंदाजांना खूप मदत करणारी आहे. लंच नंतर खेळपट्टी स्पिन गोलंदाजांना किती मदत करते, यावर पहिल्या कसोटी सामन्याचे गणित अवलंबून असणार आहे. त्यातच विराट कोहली (Virat kohli) उपलब्ध नसल्याने, भारतीय फलंदाजाची सगळी मदार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलवर (kl Rahul) असणार आहे.

कसोटी सामन्याचा निकाल आजच लागणार हे स्पष्ट आहे. चौथ्या दिवशी आणि चौथ्या इनिंगमध्ये भारतीय खेळपट्ट्यांवर 230 धावांचे आव्हान हे तगडे आव्हान मानले जाते. भारतीय फलंदाज फारसे अनुभवी आणि लईत देखील नाहीत. भारतीय सलामीवीर कशी सुरुवात करून देतात, यावर सगळं काही अवलंबून आहे. मात्र इंग्लंड संघ पहिला कसोटी सामना जिंकण्याची अधिक शक्यता आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma on retirement: सकाळी उठल्यावर माझ्या मनात..” निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं धडकी भरवणारं उत्तर..

NMMC Recruitment 2024: या उमेदवारांसाठी 110 जागांची भरती; जाणून घ्या डिटेल्स आणि असा करा अर्ज..

Mumbai Customs Recruitment 2024: दहावी पास उमेदवारांसाठी या विभागात मेगा भरती; 63 हजार पगार, वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.