IND vs NZ: दमदार कामगिरीनंतर शमीचा रोहित शर्माला टोला; म्हणाला संधी दिली तर..

0

IND vs NZ: विश्वचषक 2023 मध्ये (world Cup 2023) अव्वल क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंड संघाला भारतीय संघाने काल पराभवाची धूळ चारली. या विजयाबरोबरच भारतीय संघाने पाच सामन्यात पाच विजयासह गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे. भारताच्या विजयात विराट कोहली (Virat kohli) आणि मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सिंहाचा वाटा उचलला.

एकीकडे भारतीय संघाने न्यूझीलंडवर मिळवलेल्या दमदार विजयाची चर्चा होत आहे. मात्र दुसरीकडे विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोहम्मद शमीने रोहित शर्मा (rohit sharma)विषयी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. एक प्रकारे मोहम्मद शमीने रोहित शर्माचे नाव न घेता जोरदार टोलाही लागवल्याचे, बोललं जात आहे.

सुरुवातीच्या चार सामन्यात मोहम्मद शमीला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. आठव्या क्रमांकावर एक अतिरिक्त फलंदाज असायला हवा, यामुळे शार्दुल ठाकूरला भारतीय संघाच्या अंतिम 11 मध्ये संधी देण्यात येत होती. मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाल्याने मोहम्मद शमीला संधी मिळाली.

मोहम्मद शमीने मिळालेल्या संधीचे सोने करत, त्याने न्युझीलंड संघाचे पाच फलंदाज तंबूत पाठवले. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मात्र मोहम्मद शमीने केलेल्या कामगिरीपेक्षा जास्त चर्चा त्याने केलेल्या विधानाची झाली. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मोहम्मद शमीला पत्रकाराने प्रश्न विचारला. पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना शमीने अप्रत्यक्ष रोहित शर्माला टोला लगावला.

पाठीमागचे चार सामने तुम्ही खेळला नाही. प्रत्येक खेळाडू सोबत रोहित शर्मा आपल्या रोल विषयी बोलत असतो. जेव्हा तुम्ही खेळत नव्हता, तेव्हा तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शमी म्हणाला, मी बाहेर बसून बघतच होतो. दुसरं काय करणार? संधी दिल्यानंतरच काहीतरी करून दाखवेल. अशा प्रकारे त्याने रोहित शर्मा अप्रत्यक्ष टोला लगावला.

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे मोहम्मद शमीला भारताच्या अंतिम11 मध्ये संधी मिळाली. हार्दिक पांड्या अवेलेबल झाल्यानंतर, पुन्हा मोहम्मद शमीला बाहेर बसावं लागणार असल्याचे बोललं जात आहे. भारताचा पुढचा सामना आता इंग्लंड विरुद्ध रविवारी 29 तारखेला लखनऊमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी अंतिम 11 निवडण्याचे मोठे आव्हान कॅप्टन रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यासमोर असणार आहे.

हे देखील वाचा Google Pay loan : आता तुम्हीही घेऊ शकता Google pay loan; या 8 स्टेप्स फॉलो करा, लागलीच मिळेल लोन..

Physical relationship tips: चाळीशीनंतरही तीच ताकद, उत्साह कायम ठेवायचा असेल तर या चार गोष्टी करा..

Flipkart Sale: अर्ध्या किंमतीत मिळवा हे महागडे स्मार्टफोन; Flipkart देत आहे बंपर डिस्काउंट..

Namo Shetkari Yojana: राज्य सरकारच्या नमो योजनेचा पहिला हप्ता गुरुवारी होणार जमा; नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरण

WC 2023 semi final scenario: भारत, न्युझीलंड नंतर तिसरा semifinalist मिळाला; इंग्लंडला किती संधी? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.