Flipkart Sale: अर्ध्या किंमतीत मिळवा हे महागडे स्मार्टफोन; Flipkart देत आहे बंपर डिस्काउंट..

0

Flipkart Sale: आजच्या या आधुनिक काळात स्मार्टफोनला अनन्यसाधारण महत्व आहे. आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. स्मार्टफोन घेताना सुद्धा ग्राहकांकडून विशेष खबरदार्‍या घेतल्या जातात. तुमच्याकडे केवळ स्मार्टफोन असून चालत नाही तर त्या फोनमध्ये चांगले फीचर्स असणे गरजेचे असते. उत्तम कॅमेरा, दर्जेदार प्रोसेसर, मोठ्या प्रमाणात डेटा सेव्ह करण्याची क्षमता असे अनेक फिचर्स पाहूनच स्मार्टफोन (smartphone) खरेदी केला जातो.

मात्र भन्नाट फिचर्स असणारे स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या आबाच्या बाहेर असतात, साहजिकच यामुळे अनेकांना स्मार्टफोन घेताना कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मात्र आता महागडे स्मार्टफोन फ्लिपकार्टवर निम्या किंमतीत मिळत असल्याने तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. पैश्यांच्या अडचणींमुळे आपल्याला चांगल्या फिचर्सचे फोन घेणे शक्य होत नाही. मात्र फ्लिपकार्टने सगळ्यांसाठी ही संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. फ्लिपकार्टने स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट दिला आहे. ज्यामुळे अनेक महागडे स्मार्टफोन तुम्ही अगदी अर्ध्या किंमतीत खरेदी करु शकाल.

‘फ्लिपकार्ट बिग सेव्हींग डेज सेल’ (Flipkart big saving day’s sale) असे या सेलचे नाव आहे. ज्या अंतर्गत अगदी निम्या किंमतीत तुम्ही महागडे स्मार्टफोन घेऊ शकता. फ्लिपकार्ट सदस्यांना या सेलचा पुरेपुर फायदा घेता येणार आहे. आजपासूनच या सेलला सुरुवात झाली आहे. २० जानेवारीला हा सेल संपणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाई करण्याची गरज आहे. २०२३ या नविन वर्षातला फ्लीपकार्टचा हा पहिलाच सेल असल्यामुळे फ्लिपकार्टने या सेलमध्ये बंपर डिस्काउंट दिला आहे. या सेल अंतर्गत खरेदी करता येणार्‍या काही विशेष फोन बद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत.

Samsung Galexy Z Flip 3 5G

सॅमसंगचा अतिशय सुंदर असा हा स्मार्टफोन तुम्ही या सेल अंतर्गत घेऊ शकता. या फोनची मुळ किंमत ९५ हजार ते १ लाखाच्या दरम्यान आहे. मात्र फ्लीपकार्टच्या या सेलमुळे केवळ ४९,००० रुपयांमध्ये तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. 8 GB RAM, 256 GB ROM, 12 MP+12MP असा ड्युअल रिअर कॅमेरा, 10 MP चा पुढील कॅमेरा अशा अनेक विशेषत: या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तसेच 3300mAH बॅटरी आहे, ज्यामध्ये फास्ट चार्जींगची क्षमता विकसित करण्यात आलेली आहे. तसेच या फोनला पासवर्डसाठी सेंसर फिंगरप्रींट सुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे Samsung Galexy Z Flip 3 5G चे चाहते असणार्‍यांसाठी पुन्हा अशी संधी निर्माण होणे अशक्य आहे.

IPHONE 14

अलीकडे अनेकजण आयफोनचे दिवाने असल्याचं पाहायला मिळतं. आयफोनचा कुठला नविन फोन लॉन्च होतोय, याची आतूरतेने वाट पाहिली जाते. जर तुम्ही देखील आयफोनचेचाहते असाल तर ही उत्तम वेळ आहे. IPHONE 14 हा फोन या सेल अंतर्गत घेता येणार आहे. या स्मार्टफोनची किंमत ८० हजाराच्या जवळपास आहे. मात्र हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये केवळ ६६ हजार रुपयांत मिळणार आहे. 12-12 MP चा मागील कॅमेरा तर 12 MP चा पुढील कॅमेरा या फोनला आहे. 4 GB RAM and 128 GB internal memory असे स्टोरेज यामध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या फोनवर एक्सचेंज ऑफर सुद्धा देण्यात आलेली आहे.

NOTHING PHONE 

NOTHING PHONE (1) हा नव्याने मार्केटमध्ये लॉन्च झालेला फोन आहे. या फोनमध्ये अनेक विशेषत: आहेत. 8 GB RAM 128 GB ROM या फोनमध्ये आहे. 50MP-50 MP चा मागिल कॅमेरा तर 16 MP चा पुढील कॅमेरा आहे. 4500 mAh ची बॅटरी या फोनमध्ये आहे. या फोनची मुळ किंमत ३८ हजारांच्या घरात आहे. मात्र फ्लीपकार्टच्या बीग सेव्हींग डेस अंतर्गत केवळ २६ हजार रुपयांत हा फोन तुम्ही घेऊ शकता.

Samsung Galexy S21 FE 5G

‘फ्लिपकार्ट बिग सेव्हींग डेज’ या सेल अंतर्गत हा फोन तुम्ही चक्क अर्ध्या किंमतीत घेऊ शकता. 12 MP + 12 MP + 8 MP असा याचा मागील कॅमेरा आहे. 32 MP पुढील कॅमेरा आहे. Dynamic AMOLED 2X अशी 6.4 स्क्रीन या फोनला आहे. 8 GB RAM 128 GB ROM या मोबाईलला देण्यात आलेला आहे. या फोनची मुळ किंमत ७४,९९९ रुपये आहे. मात्र फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला हा फोन केवळ ३४,९९९ रुपयांत मिळत आहे.

हे देखील वाचा Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

Babar Azam Sexting Video: मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत बाबर आझमचे तसले व्हिडिओ व्हायरल; क्रिकेट विश्वात एकच खळबळ..

BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

Viral video: शिकार करायला गेलेल्या वाघाचा माकडानेच केला करेक्ट कार्यक्रम; व्हिडिओ पाहून तुम्हीही ठोकाल सलाम..

Viral video: सापाची आणि माकडाची थरारक झुंज पाहून व्हाल थक्क; पाहा काय झाला शेवट..

PM Kisan Maandhan Yojana: या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना सरकार देतंय दरमहा तीन हजार; जाणून घ्या लगेच..

Aadhar card: आधार कार्डवरून बँक अकाउंट  केलं जातंय रिकामं; त्वरित फॉलो करा या टीप्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.