Physical relationship tips: चाळीशीनंतरही तीच ताकद, उत्साह कायम ठेवायचा असेल तर या चार गोष्टी करा..

0

Physical relationship tips: आरोग्य सर्वात मोठी संपत्ती आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र वाढत्या वयानुसार आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात  हेही वास्तव आहे. वयानुसार आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्या तरी तुम्ही मात्र आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश करून 40 नंतरही तिशितली ताकद आणि ऊर्जा कायम ठेऊ शकता.

वैवाहिक जीवनामध्ये सेक्सला प्रचंड महत्व आहे. वैवाहिक जीवनामध्ये (marriage life) आनंद, सुख, समाधान हवा असेल, तर तुमची सेक्शुअल लाईफ उत्तम असणं आवश्यक असतं. पती पत्नीच्या नात्यामध्ये याला प्रचंड महत्व आहे. ही गोष्टी तुमच्या दोघां मधलं प्रेम वाढवते. फक्त प्रेमच नाही, तर या गोष्टीमुळे वैवाहिक जीवन आनंदी आणि उत्साही, समाधानकारकही बनवते.

तुम्हालाही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये दीर्घकाळ ताकद उत्साह कायम ठेवायचा असेल, तर तुम्ही आहारात काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक असला, तरी त्याच्या जोडीला तुम्ही योग्य आहार देखील करणे आवश्यक आहे. ब्रोकोली (broccoli) हा सर्वात महत्वाचा पदार्थ आहे.

जर तुम्हाला 40 नंतरही तोच, उत्साह, तीच ताक ठेवायची असेल तर तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करायला हवा. ब्रोकोलीमध्ये फायबर व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम त्याचबरोबर लोह हे सर्वाधिक प्रमाणात असते. आठवड्यात किमान दोन ते तीन वेळा तुम्ही शंभर ग्रॅम ब्रोकोलीचे सेवन करायला हवं. ब्रोकोली वाफेवर शिजवून, किंवा कच्ची खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरते.

चाळिशी ओलांडल्या नंतर हाडे देखील कमकुवत होतात. त्यामुळे हाडांना मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही दररोज एक ग्लास दूध पिणे आवश्यक आहे. याबरोबरच हाडे मजबूत ठेवण्यासाठी दररोज दोन-तीन चमचे तीळ खाणे ही फायदेशीर ठरते.

दूध ब्रोकोली तीळ याबरोबरच तुम्ही आहारामध्ये नियमितपणे चार ते पाच बदाम खाने देखील प्रचंड उपयोगी ठरते. बदामा मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विटामिन ई फायबर त्याचबरोबर प्रोटीन्स मिळतात. नियमितपणे बदामाच्या सेवनाने त्वचा आणि हृदयाच्या समस्याही दूर होतात. सोयाबीन देखील प्रचंड फायदेशीर आहे. सोयाबीनमध्ये अँटी ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर, प्रोटीन अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे सोयाबीनचे सेवनही आठवड्यातून दोन वेळा करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Namo Shetkari Yojana: राज्य सरकारच्या नमो योजनेचा पहिला हप्ता गुरुवारी होणार जमा; नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरण

Jaggery Purity : तुम्ही खरेदी करत असलेला गूळ भेसळयुक्त आहे की नाही हे कसं ओळखाल? घ्या जाणून..

WC 2023 semi final scenario: भारत, न्युझीलंड नंतर तिसरा semifinalist मिळाला; इंग्लंडला किती संधी? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.