IND vs AUS Rajkot ODI: श्रेयस अय्यरच्या शतकानंतर तीन फलंदाज अडचणीत; राहुल द्रविड रोहित शर्मानेही दिले हे संकेत..

0

IND vs AUS Rajkot ODI: ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दोन एकदिवसीय सामान्यानंतर विश्वचषकामध्ये (world Cup 2023) भारतीय संघ कसा असेल, ते आता जवळपास स्पष्ट झाले आहे. केएल राहुल (kl Rahul) श्रेयस अय्यरच्या (shreyas Iyer) दुखापतीमुळे भारतीय संघापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र आता दोघांनीही दमदार पुनरागमन केले आहे. याशिवाय टी-20मध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांना आपल्या तालावर नाचणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही (suryakumar Yadav) एकदिवसीय क्रिकेटमध्ये लय सापडली आहे.

वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाकडे आता केवळ एक एकदिवसीय सामना शिल्लक आहे. उद्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आपला वर्ल्ड कप संघ घेऊन मैदानात उतरणार आहे. असं असलं तरी एका जागेसाठी तब्बल चार खेळाडूंमध्ये स्पर्धा असल्याने, कोणाला संधी द्यायची ही मोठी दोखेडुखी रोहित शर्मा समोर आहे.

गेल्या दोन वर्षापासून श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर दमदार खेळाचे प्रदर्शन केले आहे. चौथ्या क्रमांकावर खेळताना श्रेयस अय्यरने आतापर्यंत 46 सामन्यात 46.1 च्या सरासरी आणि 97.5 च्या स्ट्राईक रेटने 1753 धावा केल्या आहेत. मात्र दुखापतीनंतर पहिल्या दोन सामन्यात तो अपयशी ठरला. त्यांनतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा सामन्यात त्याने आक्रमक अप्रोचने दमदार शतक झळकावले.

चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर चार खेळाडूंमध्ये चढाओढ आहे. कॅप्टन रोहित शर्मापुढे ही डोकेदुखी असली तरी चारही फलंदाज दमदार फॉर्ममध्ये असल्याने, ही एक चांगली डोकेदुखी मानली जातेय. केएल राहुलने देखील आशिया चषक (Asia Cup) आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दोन्हीं सामन्यात चौथ्या क्रमांकावर दमदार खेळ केला आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असल्याने, त्याला संधी देण्यात येणार आहे.

श्रेयस अय्यरची जागा चौथ्या क्रमांकासाठी निश्चित केली जाणार असल्याने, केएल राहुलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी टीम मॅनेजमेंट उतरवणार आहे. त्यामुळे आपला आवडता चौथा क्रमांक केएल राहुलला सोडून श्रेयशला द्यावा लागणार आहे.

एकीकडे भारताच्या अंतिम 11 मध्ये श्रेयस अय्यरचा समावेश केला जाणार असल्याने, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर जर अपयशी ठरला असता, तर मात्र सूर्यकुमार यादवला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली असती.

हे देखील वाचा AUS vs IND 3rd ODI: भारत तिसऱ्या वनडेत उतरवणार World Cup 2023 चा संघ; जाणून घ्या playing 11..

IND vs AUS 3rd ODI: तिसऱ्या वनडेत होणार सात बदल; जाणून घ्या कोण-कोण बसणार बाहेर..

Redmi Note 13: 100MP कॅमेरा असलेला Redmi चा तगडा फोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स..

Shreyas Iyer: सूर्या, ईशान की श्रेयस कोणाला मिळणार संधी? अखेर झालं स्पष्ट; असा असेल world Cup 2023 चा भारतीय संघ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.