Drunk Woman and Police viral video: त्या कारणामुळे नशेत असणाऱ्या तरुणीने थेट पोलिसांशी केले दोन हात; कॉलर पकडत म्हणाली..

0

Drunk Woman and Police viral video: नशेत पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात वाढल्याचे पाहायला मिळते. यात तरुणी देखील पाठीमागे नाहीत. सामान्यांकडून कायद्याचं पालन व्हावं, यासाठी पोलीस आपलं कर्तव्य बजावत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नशेत एका तरुणीने पोलिसांशी हुज्जत घातली. आणि पोलिसांचा कॉलर पकडत जोरदार राडा केला.

सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेला हा व्हिडिओ (viral video) बेंगलोर (Bangalore) मधील आहे. कार पार्किंगच्या (car parking) किरकोळ कारणावरून तरुणीने पोलिसांशी हुज्जत घातली. नशेत असणाऱ्या तरुणीने नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केली होती. साहजिकच त्यामुळे तिला पोलिसांनी हटकले. पोलिसांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी नशेत असणाऱ्या तरूणीने थेट पोलिसांशी दोन हात केले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दारू पिऊन टल्ली झालेल्या तरुणीला पोलीस समजावत आहेत. मात्र पोलिसांचं एकही ऐकून न घेता, तरुणी थेट पोलिसांच्या अंगावर पळत सुटताना पाहायला मिळत आहे. एवढेच नाही, तर पोलिसांवर हात देखील या तरुणीने उगारला. बंगळुरु शहरातील चर्च स्ट्रीट (Church Street) या रोडवर हा प्रकार घडला. (Bangalore Church Street)

चर्च स्ट्रीट हा परिसर नाईट लाईफकरिता ओळखला जातो. पब त्याचबरोबर नाईट क्लब रात्री उशिरा पर्यंत याठिकाणी सुरु असते साहजिक त्यामुळे या परिसरात सातत्याने मद्यपी कायद्याचं उल्लंघन करताना पाहायला मिळतात. अनेकदा थेट रस्त्यावर धांगड धिंगा करताना आढळतात. या सगळ्यांवर आळा बसावा, यासाठी पोलीस या ठिकाणी नेहमी आपले कर्तव्य पार पाडत असतात.

काल या परिसरात एक तरुणी दारुच्या नशेत होती. तिने आपली कार पार्किंग केलेल्या घटनेमुळे पोलिसांनी तिला जाब विचारला. पोलिसांना सहकार्य करायचं सोडून ती पोलिसांवरच संतापली. पोलिसांशी उज्जत घातल्यानंतर देखील या तरुणीला पोलिसांनी एका रिक्षामध्ये व्यवस्थित बसवून घरी पाठवलं. भर रस्त्यामध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. अनेकांनी तरुणीवर टीका केली. तर पोलिसांचे कौतुक केले आहे.

हे देखील वाचा Snake viral video: जिवंत उंदरला सापाने गिळले, उंदीर पोट कुरतडून बाहेर आले; पाहा हा खतरनाक व्हिडिओ..

Rohit Sharma on T20 world cup 2024: T20 World Cup खेळणार का? रोहितने थेट सांगितल्याने एकच खळबळ; पाहा व्हिडिओ..

WI vs IND 2nd T20: हार्दिक पांड्याच्या त्या एका चुकीमुळे भारताने जिंकलेला सामना गमावला; दिग्गजांनीही केली जोरदार टीका..

Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

Aacharya Chanakya quotes: सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्याचे हे आहेत तीन मूलमंत्र..

Ileana DCruz Baby Boy: नवऱ्याविना इलियाना झाली आई; तुम्हालाही माहित नाही इलियानाच्या बाळाचा पिता? मग वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.