Rohit Sharma on T20 world cup 2024: T20 World Cup खेळणार का? रोहितने थेट सांगितल्याने एकच खळबळ; पाहा व्हिडिओ..
Rohit Sharma on T20 world cup 2024: भारतीय संघ सध्या वेस्टइंडीजमध्ये टी ट्वेंटी मालिका खेळत आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात वेस्टइंडीजमध्ये सुरू असलेल्या T-20 मालिकेमध्ये भारतीय संघाला पहिल्या दोन टी-ट्वेन्टी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनतर आता सोशल मीडियावर हार्दिक पांड्या मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील होत आहे. एकीकडे हार्दिक पांड्यावर मिम्स बनवले जात असतानाच दुसरीकडे रोहित शर्माने टी ट्वेंटी क्रिकेट खेळण्याविषयी केलेल्या भाष्याने खळबळ उडाली आहे. (Rohit Sharma big statement on T20 World Cup 2024)
लगातार दोन T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय भारतीय संघाची सुमार कामगिरी राहिली. 2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी सेमीफायनल मध्ये भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या संघ बांधायला सुरुवात केली. आयपीएलमध्ये केलेल्या उत्कृष्ट कॅप्टनसीच्या जोरावर हार्दिक पांड्याला T20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले.
एकीकडे हार्दिक पांड्या आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी संघ बांधणी करत आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकेत झालेले एका कार्यक्रमामध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) केलेल्या विधानाने हार्दिक पांड्याच्या पोटात गोळा आणला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) हे दिग्गज आता टी-ट्वेंटी संघात दिसणार नसल्याचे, निवड समितीने एकप्रकारे देखील स्पष्ट केलं होतं. या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नसली तरी, विश्वचषकानंतर झालेल्या अनेक T20 मालिकांमध्ये रोहित आणि विराटची निवड ,झालेली नाही.
साहजिकच त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना देखील आता भारताच्या t20 संघात रोहित, विराट खेळताना दिसणार नाहीत असेच वाटत होते. मात्र अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये रोहित शर्माने उपस्थिती लगावली. या अमेरिकेत आल्यानंतर कसं वाटतंय? हा प्रश्न त्याला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित शर्माने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
रोहित शर्मा म्हणाला, अमेरिकेत येणं हे खूप आनंद आणि सुख देणारी गोष्ट असते. यावेळी मात्र अमेरिकेत मी केवळ आनंद घेण्यासाठीच आलो नाही. तर आम्हाला पुढच्या वर्षी T20 विश्वचषक देखील खेळायचा आहे. तुम्हाला माहितीच आहे, 2024 मध्ये आम्ही अमेरिकेत T20 विश्वचषक खेळणार आहोत. त्यामुळे इतरांप्रमाणे मी देखील यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे रोहित शर्मा म्हणाला.
Rohit Sharma – "In June, a World Cup is taking place here(USA). I'm really looking forward to it."@ImRo45 @ICC #RohitSharma #T20WorldCup #T20I #Hitman #SportsTakpic.twitter.com/zoI8Iya80P
— Sports Tak (@sports_tak) August 6, 2023
रोहित शर्माने केलेल्या या विधानामुळे, आता हार्दिक पांड्याच्या पोटात गोळा आला असेल हे मात्र नक्की. टी ट्वेंटी क्रिकेट पासून आम्ही दूर झालो नसून, टी ट्वेंटी क्रिकेट खेळणार असल्याचा एकप्रकारे इशारा रोहित शर्माने दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रोहित आणि विराट कोहलीचे T20 करिअर संपुष्टात आल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आगामी T20 मालिकेसाठी रोहित आणि विराटची निवड होणार का? हे पाहणं देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे देखील वाचा WI vs IND 2nd T20: हार्दिक पांड्याच्या त्या एका चुकीमुळे भारताने जिंकलेला सामना गमावला; दिग्गजांनीही केली जोरदार टीका..
Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..
Aacharya Chanakya quotes: सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्याचे हे आहेत तीन मूलमंत्र..
BoAt Airdopes: BoAt Airdopes 899 रुपयांत खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कुठे सुरू आहे ऑफर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम