Ileana DCruz Baby Boy: नवऱ्याविना इलियाना झाली आई; तुम्हालाही माहित नाही इलियानाच्या बाळाचा पिता? मग वाचा सविस्तर..

0

Ileana DCruz Baby Boy: बॉलीवूडच्या (Bollywood) अनेक सुपरस्टारचे खाजगी आयुष्य देखील एखाद्या चित्रपटाच्या कथेला लाजवेल असेच असतं. इलियाना डीक्रूज (Ileana DCruz) ही देखील त्यापैकीच एक आहे. गेल्या काही वर्षांपासून इलियाना चित्रपटापासून दूर आहे. आपले खासगी आयुष्य ती खूप आनंदात घालवत आहे. आज तिने आपल्या बाळाला जन्म दिला आहे. या बातमीने तिने अनेकांना सुखद धक्का दिला आहे. नवजात बाळाचा फोटो देखील तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

इलियाना प्रेग्नेंट राहिल्यापासूनच चर्चेत होती. इलियानाच्या होणाऱ्या बाळाचा पिता कोण? याविषयी अनेकांना कुतूहल होतं. इलियानाने लग्न केलं आहे की नाही? तिचा बॉयफ्रेंड कोण आहे? असे असंख्य प्रश्न सोशल मीडियावर विचारले देखील गेले. परंतु कोणालाही या प्रश्नांची ठोस उत्तरे मिळाली नाहीत. मात्र आता या सगळ्या प्रश्नांवर पडदा पडला असून, इलियानाने आपल्या बाळाचे नाव देखील जाहीर केले आहे.

इलियाना डिक्रूझने आपल्या गोंडस मुलाला जन्म दिला असून, चिमुकल्यांचे फोटो देखील तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. फोटो बरोबर तिने आपल्या मुलाचं नाव देखील जाहीर केलं आहे. इलियानाने आपल्या मुलाचे नाव “कोआ फिनिक्स डोलन (Koa Phoenix Dolan) असं ठेवल्याने बाळाचा पिता कोण? हे देखील स्पष्ट झालं आहे. इलियानाने जन्म दिलेल्या बाळाच्या पित्याचे नाव मायकल डोनल (michael dolan) असून तिने त्याच्यासोबत लग्न देखील केल्याची माहिती आता समोर आली आहे. (Ileana D’Cruz got married to Michael Dolan)

कधी केले लग्न..?

मीडिया रिपोर्टनुसार इलियानाने आपला बॉयफ्रेंड मायकल डोनल ह्याच्याबरोबर 13 मे रोजी लग्न केला आहे. तिने हे लग्न मॅरेज रजिस्ट्री डिटेलनुसार केलं आहे. मात्र दोघांनी लग्न कुठे केले? याविषयी अध्याप कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. काही महिन्यांपूर्वी इलियानाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून वाईट वेडिंग गाऊन परिधान करत फोटो पोस्ट केले होते. त्यावेळी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड स्पष्ट दिसत नसल्याने ओळखता आलं नव्हतं. मात्र तेव्हाच तिने मायकल डोलनशी लग्न केले होते.

कोआ फिनिक्स डोलन या नावाचा अर्थ काय?

Koa या शब्दाचा अर्थ योद्धा आणि निर्भय असा होतो. इलियानाने आपल्या मुलाचे नाव जाहीर करताना लिहिले, आमच्या मुलाने आज जगात पाऊल ठेवले आहे. आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे. आमच्या भावना आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझं हृदय प्रचंड भरून गेलं असल्याचं तिने आपले इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टमध्ये म्हटले आहे.

 हे देखील वाचा Chanakya Niti; ..म्हणून पती-पत्नीने चुकूनही एकमेकांसमोर बदलू नयेत कपडे; वाचा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले कारण..

Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

IND vs WI 2nd T20: या खेळाडूच्या जागी यशस्वीला संधी; असा आहे दुसऱ्या T20 साठी भारतीय संघ..

Dhanashree Verma With Siraj: श्रेयस अय्यर नंतर धनश्रीचे मोहम्मद सिराज सोबत अफेअर; त्या व्हायरल फोटोमध्ये झाला खुलासा..

BoAt Airdopes: BoAt Airdopes 899 रुपयांत खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कुठे सुरू आहे ऑफर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.