Weather Update: उत्तर भारतात पाऊसाचे थैमान, तर महाराष्ट्रात फिरवली पाठ; अशी आहे महाराष्ट्रात पाऊसाची स्थिती..

0

Weather Update: एकीकडे उत्तर भारतामध्ये पावसाने थैमान घातला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्राकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. हिमाचल प्रदेशामध्ये अक्षशः जलप्रलय आलाय. तर दिल्लीमध्ये देखील पावसाने थैमान घातले आहे. उत्तर भारतातल्या (North India) अनेक राज्यांमध्ये पाऊस जोरदार (rain) बरसत असला तरी महाराष्ट्राकडे मात्र सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे. परंतु आता राज्यातल्या जनतेसाठी आनंदाची बातमी असून, महाराष्ट्रात देखील पाऊस बरसणार आहे.

देशामधील अनेक राज्यात मान्सून दाखल झाला असून, पाऊस दमदार कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने, हिमाचल प्रदेश, दिल्ली, चंदीगडमध्ये थैमान घातले आहे. गेल्या ४० वर्षांचा विक्रम दिल्लीने मोडीत काढला आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, यमुना नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्याचे रूपांतर अक्षरशः नदीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असली तरी दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे.

म्हणून उत्तर भारतात कोसळतोय पाऊस..

एकीकडे देशातल्या अनेक राज्यांमध्ये पाऊसाने पाठ फिरवली असली तरी दुसरीकडे उत्तर भारतामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. उत्तर भारतात पाऊस पडण्याचे कारण भारताच्या हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये दोन मान्सून सक्रिय झालेले आहेत. यामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि बंगालच्या उपसागरामधून वाहणारे मान्सूनचे वारे असे दोन मान्सून सक्रिय झाले आहे. या दोन्ही मान्सूनचे मिश्रण झाल्याने, उत्तर भारतामध्ये महाप्रलय आला आहे.

सरासरीपेक्षा जास्त पाऊस

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवली असताना देशातल्या 10 राज्यांमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तरखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात अशा राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात मात्र आतापर्यंत खूपच कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील धरणांमध्ये 29 टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे.

उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने आता महाराष्ट्रात पाऊस कधी येणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात देखील येणाऱ्या चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार आणि अतीमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात देखील चार दिवसातत मुसळधार आणि अतीमुसळधार पाऊस पडणार असल्याचं अंदाज आहे.

महाराष्ट्राच्या काही भागात पाऊसाने पाठ फिरवली असली तरी मुंबई, कोकण, पुणे लोणावळा, ठाणे, खंडाळा, इगतपुरी, अशा भागात मान्सून चांगला दाखल झाला आहे. शहरातील धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत. पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.

हे देखील वाचा India vs Pakistan world cup 2023: पाकिस्तान संघाशिवाय होणार वनडे विश्वचषक; पाकिस्तान सरकारने घेतला निर्णय..

IND vs WI test: यशस्वी येणार सलामीला, असा आहे रोहितने जाहीर केलेला संघ..

Relationship: ..म्हणून या तीन पोरांकडे पोरी ढुंकूनही पाहत नाहीत..

ODI World Cup Ticket Rates: वर्ल्डकप सामन्यांचे तिकीट दर जाहीर; चाहत्यांमध्ये आनंदी आनंद..

Running Shoes For Men: या वेबसाइटवर ब्रँडेड रनिंग शूज मिळतायत निम्म्या किंमतीत..

Career After 12th Stream: 12वी कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी हे आहेत सात सर्वोत्तम पर्याय; एडमिशन मिळाल्यास जीवन जाईल बदलून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.