IND vs WI test: यशस्वी येणार सलामीला, असा आहे रोहितने जाहीर केलेला संघ..

0

IND vs WI test: आज पासून भारत आणि वेस्टइंडिज दौऱ्याला सुरुवात होत आहे. दोन कसोटी (2 test match) सामने तीन वनडे (3 ODI) आणि पाच सामन्यांची टी-ट्वेंटी (5 t20) मालिका भारतीय संघाला वेस्टइंडीज विरुद्ध खेळायची आहे. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू होणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC 2023) भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून क्रिकेटच्या सर्व प्रकारात आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला. पराभवामुळे भारतीय संघाला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा. या सगळ्याचा परिणाम म्हणून, चेतेश्वर पुजाराचा बळी देखील गेला.

भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) आता भारतीय संघामध्ये नवीन खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला. आयपीएल (IPL) आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भारताच्या टी20 आणि कसोटी संघात समावेश केला. आता या खेळाडूंकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार असून, आजपासून नवीन खेळाडूंची परीक्षा सुरू झाली आहे. यशस्वीने (Yashasvi Jaiswal) आयपीएल आणि डोमेस्टिकमध्ये देखील आपल्या फलंदाजीकडे अनेकांचे लक्ष वेधून घेतलं.

आजपासून सुरू होणाऱ्या कसोटी संघात सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वालचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून देण्यात आली आहे. याबरोबरच जलदगती गोलंदाज मुकेश कुमारला (Mukesh Kumar) देखील भारताच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय विकेटकीपर फलंदाज म्हणून, ईशान किशनकडे (ishan Kishan) भारतीय संघ जाणार असण्याची दाट शक्यता आहे.

सलामीवीर शुभमन गिलने खूप कमी काळात भारताचा प्रिन्स म्हणून ओळख निर्माण केली. केएल राहुलच्या अनुपस्थितीमध्ये शुभमन गिलला कसोटीमध्ये सलामी करण्याची संधी मिळाली. ही संधी त्याने दोन्ही हाताने कबूल करत, दमदार खेळ केला. मात्र आता वेस्टइंडीज दौऱ्यावर कसोटीमध्ये त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार आहे. यशस्वी रोहित शर्मा बरोबर सलामीला येणार असल्याने, गिलला भारतीय टीम मॅनेजमेंटने क्रमांक तीनची नवी जबाबदारी दिली आहे.

ईशान किशन की केएस भरत

विकेट कीपर फलंदाज म्हणून ईशान किशन की भरत यावर अद्याप निर्णय झाला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये केएस भरतला संधी मिळाली होती. ईशान किशन पेक्षा भरत विकेटकीपर म्हणून सरस असल्याने, त्याला ही संधी मिळाली. इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग होत असल्याने एका चांगल्या विकेटकीपरची आवश्यकता असते. मात्र फलंदाजीमध्ये तो अपयशी ठरला. आता हीच बाब लक्षात घेऊन मॅनेजमेंट ईशान किशनकडे जाणार असल्याची शक्यता अधिक आहे.

असा आहे भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शुबमन गिल, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, श्रीकर भारत, जयदेव उनाडकट,

हे देखील वाचा Relationship: ..म्हणून या तीन पोरांकडे पोरी ढुंकूनही पाहत नाहीत..

ODI World Cup Ticket Rates: वर्ल्डकप सामन्यांचे तिकीट दर जाहीर; चाहत्यांमध्ये आनंदी आनंद..

IND vs WI: Star sports, JioCinema नाही, फक्त याच ठिकाणी पाहता येईल IND vs WI मालिका..

Tiger monkey video: माकडाने दोन वाघांना करून सोडलं सळो की पळो; व्हिडिओ पाहून बसाल डोळे चोळत..

Best selling Smartphones: हे आहेत चार सर्वाधिक विक्री होत असलेले स्मार्टफोन; अमेझॉनवरही मिळतायत कमी किंमतीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.