Best selling Smartphones: हे आहेत चार सर्वाधिक विक्री होत असलेले स्मार्टफोन; अमेझॉनवरही मिळतायत कमी किंमतीत..

0

Best selling Smartphones: अलीकडे स्मार्टफोन ही प्रत्येकाची मूलभूत गरज बनली आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून उदरनिर्वाह देखील होतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अलीकडच्या काळात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात ब्लॉगिंग या क्षेत्राकडे वळल्याचे पाहायला मिळतं. त्यासाठी चांगल्या कॅमेरा स्मार्टफोनची आवश्यकता असते. जर तुम्ही देखील या क्षेत्राकडे वळणार असाल, किंवा चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

कमी किंमतीमध्ये जबरदस्त फीचर्स असणारे, आणि अलीकडे सर्वाधिक विक्री झालेल्या काही स्मार्टफोनविषयी माहिती आम्ही या लेखातून देणार आहोत. हे स्मार्टफोन (smartphone) फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अमेझॉन (Amazon) या दोन्ही ई-कॉमर्स वेबसाईटवर (e-commerce website) उपलब्ध देखील आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही वेबसाईटवर तुम्हाला हे स्मार्टफोन ऑफरमध्ये खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

OnePlus Nord CE 3 Lite 5G

OnePlus Nord CE 3 Lite 5G हा स्मार्टफोन तरुणाईंच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरला आहे. दर्जेदार फीचर्स बरोबरच या स्मार्टफोनची किंमत देखील सर्वसामान्यांना परवडेल अशा स्वरूपात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये हा स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विक्री झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत एकवीस हजार 999 रुपये आहे. मात्र ॲमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर तुम्हाला दोन हजार रुपयांनी डिस्काउंटमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

या स्मार्टफोनच्या फीचर्स विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 108mp कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच 2 मेगापिक्सल मायक्रो लेन्स, त्याचबरोबर 16 MP सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनला 120 Hz रिफ्रेश रेट असणारा 6.72 इंच डिस्प्ले असणार आहे. हा स्मार्टफोन Android 13.1 सह Oxygen OS वर काम करतो.

Samsung Galaxy M14 5G

तुम्ही सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला Samsung Galaxy M14 5G हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. अमेझॉन वेबसाईटवर हा स्मार्टफोन तुम्हाला 14 हजार 490 रुपयांना खरेदी करता येणार आहे. बँक ऑफरचा लाभ घेतला तर तुम्हाला हा फोन दीड हजार रुपयांनी स्वस्त देखील मिळेल. या स्मार्टफोनला 50 MP कॅमेरा, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, त्याचबरोबर 6000mAh बॅटरी मिळणार आहे.

Realme Narzo N55 

Realme Narzo N55 हा स्मार्टफोन देखील सर्वाधिक विक्री झालेल्या यादीमध्ये आहे. Amazon या e commerce website वर हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ १०,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. फीचर्स विषयी सांगायचं झाल्यास, कमालीचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. 5000mAh बॅटरी, सोबतच 33W SuperVOOC चार्जिंग जी केवळ एका तासात फुल चार्ज होते. Realme स्मार्टफोनमध्ये 64MP कॅमेरा देण्यात आला आहे.

अमेझॉन वेबसाईटवरून तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट पर्याय आहेत. तुम्हाला 15 जुलैपासून या स्मार्टफोनची खरेदी ऑफरमध्ये करता येणार आहे. मात्र हा सेल केवळ एका दिवसापुरता मर्यादित आहे. म्हणजेच 15 जुलैपासून 16 जुलै पर्यंत तुम्ही ऑफरमध्ये ॲमेझॉन वरून स्मार्टफोन खरेदी करू शकता.

हे देखील वाचा Career After 12th Stream: 12वी कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी हे आहेत सात सर्वोत्तम पर्याय; एडमिशन मिळाल्यास जीवन जाईल बदलून..

Running Shoes For Men: या वेबसाइटवर ब्रँडेड रनिंग शूज मिळतायत निम्म्या किंमतीत..

IND vs WI: Star sports, JioCinema नाही, फक्त याच ठिकाणी पाहता येईल IND vs WI मालिका..

smartphone buying tips: तुमचा स्मार्टफोन duplicate तर नाही? या पाच गोष्टी तपासून करा स्पष्ट..

Maharashtra politics: त्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटलांच्या डोळ्यात आलं पाणी; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.