smartphone buying tips: तुमचा स्मार्टफोन duplicate तर नाही? या पाच गोष्टी तपासून करा स्पष्ट..

0

smartphone buying tips: अलीकडे स्मार्टफोनला (smartphone) अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेकजण आपला व्यवसाय देखील करतात. स्मार्टफोन हे फक्त आता मनोरंजनाचे साधन राहिले नाही, तर स्मार्टफोनच्या माध्यमातून रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. स्मार्टफोनला प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे. याबरोबरच बाजारामध्ये डुबलीकेट स्मार्टफोन देखील मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत. तुम्ही खरेदी करत करणाऱ्या त्याच कंपनीचा सेम टू सेम डुबलीकेट स्मार्टफोन तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्हाला यापासून वाचायचं असेल, तर या पाच गोष्टी लक्षात ठेवा.

उत्पादन तपशील

जर तुमचा स्मार्टफोन डुबलीकेट असेल, तर तुमच्या स्मार्टफोनला उत्पादन तपशील दिला जात नाही. फोनमध्ये उत्पादन तपशील तर असे स्मार्टफोन चुकूनही खरेदी करू नका. यासोबतच तुम्ही स्मार्टफोन खरेदी करताना ओरिजनल पावती देखील घेणे आवश्यक आहे. ज्यामध्ये जीएसटी नंबर समाविष्ट असेल.

तुम्ही ज्या कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करणार असाल, त्या कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये काय तपशील आहेत, हे गुगलवर सर्च देखील करू शकता. जर तुम्ही खरेदी करणारा स्मार्टफोन आणि ऑनलाइन असणाऱ्या स्मार्टफोनचे तपशील जुळत असतील, तरच तुम्ही स्मार्टफोन खरेदी करा.

तपशील

कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्याअगोदर त्या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स चेक करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये प्रोसेसर, स्टोरेज त्याचबरोबर रॅम, कॅमेरा अशा गोष्टी तपासूनच खरेदी करणे आवश्यक आहे. ज्या कंपनीचा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करणार असाल, त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्मार्टफोनचे सर्व तपशील क्रॉसचेक करून पाहणे आवश्यक आहे.

ऑपरेटिंग सिस्टम

ओरिजनल स्मार्टफोन ओळखण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्या स्मार्टफोनचे ऑपरेटिंग सिस्टीम हे अँड्रॉइड आवृत्तीशी जुळणे आवश्यक आहे. हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधील सेटिंगमध्ये जाणे आवश्यक आहे. स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर, ऑपरेटिंग सिस्टीम हे तपासून ओरिजनल स्मार्टफोन आहे, की डुप्लिकेट हे ओळखू शकता.

IMEI क्रमांक

स्मार्टफोन खरेदी करताना IMEI म्हणजेच इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हा नंबर तपासणे खूप महत्त्वाचे आहे. हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोन कॉलमध्ये जाऊन स्टार *#06# असा नंबर डायल करायचा आहे. हे डायल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा IMEI नंबर मिळणार आहे. याशिवाय तुम्ही स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन देखील आयएमईआय नंबर चेक करू शकता.

खरेदी

स्मार्टफोन खरेदी करताना नेहमी विक्रीदाराविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही ऑनलाईन खरेदी करणार असाल तर, तुम्ही स्मार्टफोन खरेदी करणार आहात त्या वेबसाईटची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जर तुम्ही दुकानामधून स्मार्टफोन खरेदी करणार असाल, तर तुम्ही दुकानदाराकडून जीएसटी असणारी पावती घेणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Tomato Price Hike: का वाढले टोमॅटोचे दर? या तारखेनंतर टोमॅटोच्या दरात होणार मोठी घसरण..

IND vs WI: Star sports, JioCinema नाही, फक्त याच ठिकाणी पाहता येईल IND vs WI मालिका..

Age Of Love: या वयात मुलींना प्रेम झालं तर कधीच देत नाहीत धोका..

Maharashtra politics: त्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटलांच्या डोळ्यात आलं पाणी; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.