Tomato Price Hike: का वाढले टोमॅटोचे दर? या तारखेनंतर टोमॅटोच्या दरात होणार मोठी घसरण..

0

Tomato Price Hike: गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे (tomato) दर गगनाला भिडले आहेत. दीड महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना टोमॅटो अक्षरशः रस्त्यावर फेकून द्यावा लागत होता. मात्र काही दिवसांपासून टोमॅटोने मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. या आठवड्यामध्ये टोमॅटोला तब्बल 170 ते 180 रुपये किलो भाव मिळाला आहे. टोमॅटो शेतकऱ्यांनासाठी अच्छे दिन आले असले तरी सर्वसामान्य मात्र टोमॅटो खाण्याचा विचारही करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Tomato Price Hike)

टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी येणारे काही दिवस सुवर्ण असणार आहेत. गुजरात मधील नवसारीमध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सतत पाऊस पडत राहिल्याने, मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे नुकसान झाले. या भागात टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेतलं जातं. मात्र यावर्षी टोमॅटोचे नुकसान झाल्याने, तुटवडा निर्माण झाला. टोमॅटोच्या किंमती वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. तमिळनाडूमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे.

का वाढले टोमॅटोचे भाव

टोमॅटोला विक्रमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन आले असले तरी, गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी अक्षरशः टोमॅटोच्या बागा देखील काढून टाकल्या. एकीकडे बाजारामध्ये 170 ते 180 रुपये किलोने टोमॅटो विक्री होत असला तरी शेतकऱ्यांना मात्र 80 ते 90 रुपये किलो असा दर मिळत आहे. आमच्यापेक्षा अधिक नफा व्यापाऱ्यांना मिळत असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

दरवर्षी टोमॅटोचे दर हे याच काळामध्ये वाढत असतात. टोमॅटो हा जास्त दिवस राहत नाही. याशिवाय टोमॅटो हे जास्त दिवस साठवून ठेवता देखील येत नाही. या बरोबरच टोमॅटोची लांब पल्ल्याची निर्यात देखील करता येत नाही. साहजिकच यामुळे उत्पन्न घटल्यांनंतर, टोमॅटोच्या किंमती प्रचंड वाढतात. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. मात्र जूनमध्ये मोठ्या प्रमाणात सतत पाऊस पडत राहिल्याने, टोमॅटोचे मोठे नुकसान झाले.

मर्यादित वापर

टोमॅटोचे दर गगनाला भिडले असल्याने अनेकांनी आपल्या किचनमधून टोमॅटोला हद्दपार केलं आहे. आम्ही पूर्वी रोज दोन किलो टोमॅटो खरेदी करायचो. मोठं कुटुंब असल्यामुळे आम्हाला रोज दोन किलो टोमॅटो लागत असतात. मात्र यावेळी आम्ही केवळ अर्धा किलो टोमॅटो खरेदी करतो. अशा प्रतिक्रिया बऱ्याच प्रमाणात ग्राहकांकडून मिळत आहेत.

कधी होणार दर कमी

एकीकडे टोमॅटोच्या दराने विक्रम केला आहे. तर दुसरीकडे टोमॅटोचे दर कधी उतरतील याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र 15 ऑगस्ट पर्यंत टोमॅटोचे दर कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. 15 ऑगस्ट नंतर बाजारामध्ये नवीन टोमॅटो दाखल झाल्यानंतर, टोमॅटोचे दर कमी होतील, असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला गेला आहे.

हे देखील वाचा Chanakya Niti On Success: ..म्हणून या तीन लोकांकडे वाईट काळ फिरकतही नाही..

PM Kisan Yojana: योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाइन अर्ज; या दिवशी जमा होणार चौदावा हप्ता..

Success Story: शाब्बास! लाल केळीतून 35 लाख उत्पन्न, वाचा इंजिनियर तरुणाची यशोगाथा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.