Success Story: शाब्बास…! लाल केळीतून 35 लाख उत्पन्न, वाचा इंजिनियर तरुणाची यशोगाथा..
Success Story: मुलगा काय करतो? शेती करतो, तुम्ही जर हे उत्तर दिले तर अनेकांचं तोंड वाकडं होतं. हे वेगळे सांगायला नको. यामध्ये त्यांची देखील काही चूक नसतेच म्हणा. शेती करणे म्हणजे, एखाद्या जुगारापेक्षा काही कमी नाही. शेतकऱ्यांसमोर चहूबाजूंनी संकट आ वासून उभं असतं. कधी कोणतं संकट घावा घालेल, हे काही सांगता येत नाही. मात्र या सगळ्यांना छेद देत, एका करमाळ्याच्या (karmala) तरुणाने विश्वास न बसणारा कारणामा केला आहे. (Red banana Success Story)
अनेक जण शेतीकडे नकारात्मकरित्या पाहतात. मुलाने उच्च शिक्षण घेऊन कुठेतरी चार पैशाची नोकरी करावी, अशी प्रत्येकाच्या घरच्यांची इच्छा असते. मात्र एका करमाळ्याच्या तरुणाने उच्च शिक्षण घेऊन नोकरी न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. तसं पाहायला गेलं, तर अलीकडे अनेक तरुण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत भरघोस उत्पन्न घेताना दिसून येतात.
अभिजीत पाटील (Abhijeet patil) असं या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, सिव्हिल इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेऊन, या तरुणाने नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीचा अवलंब करत, या शेतकऱ्याने लाल केळीची बाग यशस्वीरीत्या फुलवली. सोलापूर जिल्ह्यामधील (Solapur) करमाळा (karmala) या तालक्यात वाशिंबे (washimbe) या छोट्याश्या गावचा हा रहिवाशी आहे. जाणून घेऊया या तरुणाची यशोगाथा…
जॉब न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचं माझं सुरुवातीपासून स्वप्न होतं. आणि म्हणून लाल केळीची मागणी लक्षात घेऊन, मी माझ्या शेतात लाल केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. अनेकांचा विरोध झुगारून चार एकर क्षेत्रात मी लाल केळीची लागवड केली. आपल्या शेतात लाल केळीचे उत्पन्न निघेल का? असे प्रश्न माझ्यासमोर उपस्थित करण्यात आले. मात्र मनाशी दृढ निश्चय केला होता.
मी पुण्यामधील डी वाय पाटील या महाविद्यालयामधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं. माझ्या सीनियरांची जॉबसाठी धडपड मी जवळून पाहिली आहे. आणि म्हणून मी जॉब न करता, आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेण्याचं ठरवलं होतं. गेल्या आठ वर्षापासून मी शेती करत आहे. या आठ वर्षाच्या काळात मी अनेक नवीन पिकांवर अभ्यास केला.
लाल केळीवर देखील मी अभ्यास केल्यानंतर, लाल केळीचे उत्पादन घ्यावं या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो. अखेर मला यामध्ये यशही आलं. आणि मला चार एकर क्षेत्रात 13 महिन्यात 35 लाख रुपयांचे उत्पन्न देखील मिळाले. 13महिन्यामध्ये मला 35 लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले असले तरी, मालाची विक्री मी व्यवस्थितरित्या करू शकल्याने, हे शक्य झालं. विक्रीचे व्यवस्थित नियोजन केले, तर चांगला नफा मिळू शकतो. हाच सल्ला मी नवीन शेतकऱ्यांना देईन.
2020 मध्ये केली लागवड…
डिसेंबर 2020 साली मी चार एकर क्षेत्रामध्ये लाल केळीची लागवड केली. दोन वर्ष मेहनत करून बाग व्यवस्थित जोपासली. आणि 2022 नंतर माल निघायला सुरुवात झाला. चार एकरमध्ये केलेल्या लाल केळीच्या मालाची विक्री टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतला. मुंबई, पुणे, दिल्ली शहरांमध्ये रिलायन्स, टाटा यासारख्या मोठ्या मॉलमध्ये चांगल्या दराने केळी विक्री केली.
55 ते 65 रुपये दर…
इतर केळीच्या तुलनेत लाल केळी खाण्यासाठी पौष्टिक असते. अनेक पोषक घटक या केळीमध्ये असल्याने, मोठमोठ्या शहरांमध्ये या केळीला मोठी मागणी असते. हा विचार डोळ्यासमोर ठेवूनच, मी या केळीची लागवड केली. सध्या माझ्या लाल केळीला 55 ते 60 रुपये किलो दर मिळत आहे. काही वेळा 65 रुपये किलो दराने देखील मी माझ्या केळीची विक्री केली आहे.
हे देखील वाचा Darshana Pawar murder Case: ..म्हणून या किरकोळ कारणासाठी डिलिव्हरी बॉयनेच संपवलं दर्शना पवारला..
Monkey drinking alcohol video: पट्ट्याने माकडाला पाजली तब्बल दोन पेग दारू; पाहा व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम