Monkey drinking alcohol video: पट्ट्याने माकडाला पाजली तब्बल दोन पेग दारू; पाहा व्हिडिओ..

0

Monkey drinking alcohol video: डोळ्यांना विश्वास बसणार नाही, असे असंख्य व्हिडिओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) सातत्याने व्हायरल (viral) होताना पाहायला मिळतात. खासकरून प्राण्यासंदर्भातले. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला देखील चक्कर येऊ शकते. अनेक जण प्राण्यांसोबत मजा मस्ती करताना दिसतात. मात्र काही जणांचं डोकं कल्पने पलीकडचं असतं. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

माकड (monkey) आणि माणसांमध्ये फारसा फरक नाही. माणसाप्रमाणेच माकडांना देखील समजतं. माकडांच्या कृतीवरून तर अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो, माणसात आणि माकडामध्ये माकड बोलू शकत नाही केवळ हाच काय तो फरक. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक माकड चक्क दारू पिताना पाहायला मिळत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही दारू आली कुठून? तर एक तरुण रॉयल स्टॅग नावाच्या ब्रँड माकडाला ग्लासामधून पिऊ घालत आहे. माकड देखील दारू पिण्याचा आनंद फारच मजेशीर पद्धतीने घेत आहे. (Monkey drinking alcohol)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तरुणाचा चेहरा दाखवण्यात आला नाही. मात्र स्वतःच्या हाताने तो दारूचा पेग माकडाच्या हातात देताना दिसत आहे. माकड देखील तरुणाच्या हातातून दारूचा ग्लास घेत मोठ्या आयटीत दारू पिताना दिसत आहे. पहिला पेग संपल्यानंतर, माकड दुसरा पेग भरण्यासाठी तरुणचा हातात रिकामा ग्लास देखील देताना दिसत आहे.

तरुणाने ग्लासामध्ये दारू ओतल्यानंतर माकड तरुणाच्या हातातून क्लास घेताना देखील तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. माकड दोन पेग दारू पिल्यानंतर मात्र डुलकी मारायला सुरुवात करत असल्याचं देखील या व्हिडिओत दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ फारच मजेशीर आहे.

आदीपुरुष पाहून आल्यानंतर..

@HasnaZarooriHai या ट्विटर हँडल वरून माकडाचा हा मजेशीर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 52 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. महत्त्वाचं म्हणजे, या व्हिडिओला मजेशीर कॅप्शन देखील दिले आहे. “आदीपुरुष चित्रपट पाहून आल्यानंतर माकड..” असं भन्नाट कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे.

हे देखील वाचा.. Dilip Vengsarkar: ..म्हणून धोनीला विराट भारतीय संघात नको होता; निवड समिती अध्यक्षांच्या खुलाशाने खळबळ..

Maharashtra premier league 2023: टीम इंडियाला मिळाला कपिल देव पेक्षाही घातक ऑलराऊंडर; 54 चेंडूत 117 धावा आणि चार विकेट..

Aacharya Chanakya: या महिलांशी लग्न केल्यास घराचा विनाश होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही..

physical relationship: संबंध करताना चुकूनही खाऊ नका हे चार पदार्थ अन्यथा..

Snake rabbit viral video: ससा आणि सापाच्या झुंजीचा थरारक व्हिडिओ; शेवट पाहून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.