Aacharya Chanakya: या महिलांशी लग्न केल्यास घराचा विनाश होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही..

0

Aacharya Chanakya: स्त्री (Women) हे घराचे सौंदर्य असतं. एक स्त्री घराचा नाश आणि विनाश करते. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आपली पत्नी सुंदर असावी. सुंदरते बरोबरच प्रेमळ असावी, कुटुंबाशी आपुलकीने वागणारी असावी, एकूणच काय तर आपल्या कुटुंबात आनंद आणि सौख्य नांदेल यासाठी तिचा पुढाकार असायला हवा. असं प्रत्येक पुरुषाचं मत असतं. मात्र हे स्त्रीच्या सुख आणि समाधानावर अवलंबून असते.

घरातील स्त्री जर सुखी आणि समाधानी नसेल, तर तुमचे कुटुंब उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. सुख, समाधान, आनंद हा माणसाच्या स्वभावात दडलेला असतो. माणूस सदगुणी असेल तर अर्थात सुखी-आनंदी राहू शकतो. स्त्री बाबतीत देखील हाच नियम लागू होतो. स्त्री सद्गुनी नसेल, तर ती कधीही आनंदी राहणार नाही. जी महिला आनंदी राहत नाही ती घर उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरते. जाणून घ्या आचार्य चाणक्यांनी कोणत्या महिलांसोबत विवाह करू नये असं असं सांगितलंय…

आचार्य चाणक्य सांगतात, अहंकार अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला मातीमोल करते. ज्या स्त्रियांमध्ये अहंकार असतो, अशा महिला खूप धोकादायक असतात. अशा महिला जर घरामध्ये आल्या तर घराची अधोगती व्हायला सुरुवात होते. असं आचार्य चाणक्य सांगतात. अहंकारी माणूस कधीही लोकांच्या हिताचा विचार करत नाही. अहंकारी माणसाजवळ माता लक्ष्मी आणि सरस्वती देखील येत नाहीत. आणि म्हणून आचार्य चाणक्य सांगतात, अहंकारी स्त्री सोबत चुकूनही विवाह करू नये.

चाणक्य सांगतात, स्त्रीने नेहमी ज्ञानी असायला हवं. ज्या महिला अज्ञानी असतात, अशा महिला कुटुंबाचा उद्धार करू शकत नाहीत. कुटुंबाला स्वर्ग बनवण्यासाठी घरातील स्त्री ही शिक्षित असली पाहिजे. ज्ञानी असली पाहिजे. महिला कुटुंबासोबत अधिक वेळ असतात. आणि म्हणून घरातील लहान मुलं, इतर सदस्यांवर देखील त्याचा प्रभाव पडत असतो. महिला जर ज्ञानी असतील, तर कुटुंबावर चांगले संस्कार होतात.

आचार्य चाणक्य सांगतात, लोभ हा स्त्रियांमधील सर्वात घातक गुण आहे. लोभ निर्माण होणाऱ्या, स्त्रिया या नेहमी घरातील सुख शांती क्षणात नष्ट करून टाकतात. घरातील स्त्रियांमध्ये जर लोभ असेल तर कुटुंबाच्या विनाशाचे कारण स्त्री मधील हा गुण ठरू शकतो. आणि म्हणून आचार्य सांगतात, अज्ञानी, लोभी, अहंकारी आणि अभियान स्त्रियांशी चुकूनही विवाह करू नये.

हे देखील वाचा Chanakya Niti About Parenting : या 10 गोष्टींची काळजी पालकांनी घेतली पाहिजेच, अन्यथा होईल सत्यानाश

Chanakya Niti: फक्त या पाच गोष्टींचा त्याग करा, ब्रह्मदेव आला तरी ध्येयप्राप्ती पासून थांबवू शकत नाही..

Maharashtra Rojgar Melava 2023: महाराष्ट्र सरकारकडून महाभरती, इथे होणार मेळावा; 10/12वी/ ITI आणि पदवीधरांना नोकरीची मोठी संधी..

Niti shastra: भविष्यातील वाईट काळाचे संकेत देतात या चार गोष्टी; वेळीच ओळखा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.