Niti shastra: भविष्यातील वाईट काळाचे संकेत देतात या चार गोष्टी; वेळीच ओळखा..
Niti shastra: प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य हवं असतं. आपल्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारचे संकट येऊ नये, यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, यासाठी अनेकांना भविष्याची चिंता देखील असते. कुटुंबप्रमुख म्हणून तुमची ती जबाबदारी देखील असते. मात्र कुटुंबावर संकट येणार असेल, तर तुम्हाला काही संकेत देखील मिळतात. (Chanakya Niti)
आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) आपल्या नीतीशास्त्रामध्ये (Niti Shastra) कुटुंबा संबंधी अनेक गोष्टींचा अभ्यास केला आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही उत्कृष्ट कुटुंब प्रमुख म्हणून उदयास येऊ शकता. आचार्य चाणक्य सांगतात, कुटुंबावर भविष्यात संकट येणार आहे, याचे संकेत तुम्हाला मिळू लागतात. मात्र तुम्ही ते वेळीच ओळखणे आवश्यक असते. भविष्यामध्ये संकट निर्माण होणारी कोणते सकेत मिळतात? वाचा सविस्तर..
जर तुमच्या कुटुंबावर वाईट वेळ येणार असेल, तर याचे काही संकेत तुम्हाला वेळोवेळी मिळत असतात. सर्वप्रथम कुटुंबात भांडण. जर तुमच्या कुटुंबात सतत वाद-विवाद, तंटे होत असतील तर भविष्यामध्ये तुमच्यावर वाईट काळ येण्याची शक्यता असते. असं आचार्य चाणक्य सांगतात. कुटुंबीय सदस्य जर एकमेकांसोबत भांडण करत असतील, तर भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
जर तुमच्यावर भविष्यात वाईट काळ येणार असेल तर याचा दुसरा संकेत म्हणजे, तुमच्या अंगणात असणारी तुळस. तुमच्या अंगणातली तुळस सुखत चालली असेल, किंवा सुकली असेल तर येणारा काळ हा तुमच्यासाठी आव्हानात्मक असतो. आणि म्हणून आचार्य चाणक्य सांगतात, घरासमोरील तुळस कधीही सुकता कामा नये.
आचार्य चाणक्य सांगतात, जीवन जगत असताना संघर्ष करावा लागतो. मात्र कोणत्याही कारणावरून वाद घालणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. जर भांडणावेळी घरातील एखादी काच फुटली, किंवा काही काम करताना तुमच्या हातून आरसा पडला, तर हा भविष्यात अडचणी निर्माण होणारा मोठा संकेत असल्याचे चाणक्य सांगतात. जर घरात फुटलेली काच असेल, तर हे अशुभ संकेत मानले जाते.
आचार्य चाणक्य सांगतात, भविष्यामध्ये जर तुम्हाला वाईट काळ पाहायचा नसेल, तर तुम्हाला नियमितपणे लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला लक्ष्मीची आराधना करून तुम्ही तिला प्रसन्न करू शकता. लक्ष्मीचा जर घरात नेहमी वास राहिला, तर तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही. असा उपदेश चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति या ग्रंथांमध्ये केला आहे.
हे देखील वाचा Chanakya Niti; ..म्हणून पती-पत्नीने चुकूनही एकमेकांसमोर बदलू नयेत कपडे; वाचा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले कारण..
Chanakya Niti: या लोकांना समाज समजतो मूर्ख; कुठेच मिळत नाही मान-सन्मान..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम