Dilip Vengsarkar: ..म्हणून धोनीला विराट भारतीय संघात नको होता; निवड समिती अध्यक्षांच्या खुलाशाने खळबळ..

0

Dilip Vengsarkar: विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी (Virat Kohli and MS dhoni) या दोन्ही माजी कर्णधारांमध्ये किती घनिष्ठ मैत्री आहे, हे संपूर्ण क्रीडा विश्वाला माहिती आहे. दोघांना एकमेकांप्रती कमालीचा रिस्पेक्ट देखील आहे. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या नेतृत्वात क्रिकेट देखील खेळले देखील आहे. मात्र 2008 मध्ये महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh dhoni) जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार (Indian team captain) होता, तेव्हा विराट कोहली त्याला भारतीय संघात नको होता. एवढंच नाही तर संघात नको असण्यापाठीमागचे गंभीर कारण देखील समोर आल्याने, एकच खळबळ उडाली आहे. (Virat Kohli MS Dhoni)

2008 मध्ये अंडर19 क्रिकेट संघाचा विराट कोहली कॅप्टन होता. अंडर19 विश्वचषकात विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा देखील जिंकली होती. या स्पर्धेत विराट कोहलीची कामगिरी देखील दमदार राहिली होती. विराट कोहलीने 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर त्याची निवड भारतीय संघात करण्यात आली.

2008 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समिती अध्यक्षपदावर दिलीप वेंगसरकर होते. (Dilip Vengsarkar) दिलीप वेंगसरकर यांनी संदर्भात मोठा खुलासा केल्याने, आता क्रीडा विश्वात अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दिलीप वेंगसरकर यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत या संदर्भात सविस्तर भाष्य केले आहे.

दिलीप वेंगसरकर म्हणाले 2008 साली जेव्हा मी निवड समितीचा अध्यक्ष होतो, तेव्हा मला विराट कोहलीला भारतीय संघात स्थान द्यायचे होते. मात्र माझ्या या निवडी विरोधात महेंद्रसिंग धोनी होता. एवढेच नाही, तर चेन्नई सुपर किंग संघाचे मालक श्रीनिवासन हे देखील विराट कोहली ऐवजी चेन्नई सुपर किंग संघामधील फलंदाजाला भारताच्या प्रमुख संघात निवडण्यासाठी माझ्यावर दबाव आणत होते.

दिलीप वेंगसरकर म्हणाले, महेंद्रसिंग धोनीला देखील विराट कोहलीला भारतीय संघात स्थान द्यायचे नव्हते. विराट कोहलीच्या जागेवर एस बद्रीनाथ या फलंदाजाच्यानिवडण्याचा आग्रह महेंद्रसिंग धोनीने धरला होता. मात्र मी कोणाचेही न ऐकता, विराट कोहलीला श्रीलंके दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात स्थान दिले. दिलीप वेंगसरकर यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआय पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप

2008 मध्ये विराट कोहलीची जेव्हा श्रीलंके दौऱ्यासाठी निवड झाली, तेव्हा बीसीसीआयचे कोषाध्यक्ष श्रीनिवासन होते. आणि म्हणून भारतीय संघात चेन्नईच्या खेळाडूची निवड व्हावी यासाठी ते प्रयत्नशील होते. भारतीय निवड समिती ही बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या हाताखालचं बाहुलं असल्याची टीका वारंवार होते.

भारताच्या निवड समितीवर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचा दबाव असतो. निवड समिती जरी भारतीय क्रिकेट संघाची निवड करत असली, तरी बीसीसी पदाधिकाऱ्यांचा संघ निवडीमध्ये हस्तक्षेप असतो. हे आता लपून राहिले नाही.

हे देखील वाचा Maharashtra Rojgar Melava 2023: महाराष्ट्र सरकारकडून महाभरती, इथे होणार मेळावा; 10/12वी/ ITI आणि पदवीधरांना नोकरीची मोठी संधी..

Maharashtra premier league 2023: टीम इंडियाला मिळाला कपिल देव पेक्षाही घातक ऑलराऊंडर; 54 चेंडूत 117 धावा आणि चार विकेट..

Chanakya Niti: फक्त यापाच गोष्टींचा त्याग करा, ब्रह्मदेव आला तरी ध्येयप्राप्ती पासून थांबवू शकत नाही..

Lust Stories 2 trailer: इंटीमेट सीन्सचा भरणा असणारा आणखी एक ट्रेलर रिलीज; तमन्नाने पार केल्या साऱ्या सीमा..

Maharashtra Weather Forecast: पावसाची प्रतीक्षा संपली, या तारखेपासून पाऊस पडायला होणार सुरुवात; या भागात अलर्ट जारी

Cow Vs Tiger Fight: अरे बापरे! दबक्या पावलाने गाईने केली वाघाची शिकार, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.