Maharashtra Weather Forecast: पावसाची प्रतीक्षा संपली, ‘या’ तारखेपासून पाऊस पडायला होणार सुरुवात; ‘या’ भागात अलर्ट जारी
Monsoon 2023 Update In Maharashtra: पावसाचे आगमन लवकरच
Maharashtra Weather Forecast: पावसाची वाट पाहून हातबल झालेला शेतकरी अक्षरशः वैतागला आहे. प्रत्येकाला आपल्या भागात कधी पाऊस पडणार, याची चिंता लागली आहे. राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अद्यापही शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. पाऊस पडेल या अपेक्षेने काही लोकांनी पेरणी केली, परंतु पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. परंतु आता हवामान खात्याने पावसाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बातमी आनंदायकच आहे.
येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस कोकणासह राज्यातील महत्त्वाच्या काही भागांमध्ये होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मोसमी वाऱ्यांसाठी राज्यात सध्या पोषक स्थिती निर्माण झाली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. येत्या 3 दिवसांत राज्यात मान्सून हजर होईल, असा इशारा हवामान खात्याच्या नागपूर आणि मुंबई या केंद्रांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे पावसाची वाट पाहणारा शेतकरी आता सुखावला आहे. केंद्रीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी देखील एक ट्विट करत राज्यातील हवामानाची माहिती दिली आहे.
मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता, या आशयाचे ट्विट करत केंद्रीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणात 23 जूनला पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर 24-25 जूनपासून विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच मराठवाड्यात देखील मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर 25 जून नंतर महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
21 Jun: @RMC_Mumbai & @imdnagpur ने 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र व विदर्भात ; 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता.
IMD GFS guidance for 23 -25 June indicates same. pic.twitter.com/ZzbS3WRNjI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 21, 2023
राज्यातील नाशिक ( Nashik), अहमदनगर (Ahmednagar), सातारा (Satara), सांगली Sangali), बीड (Beed), सोलापूर (Solapur), लातूर (Latur), नांदेड (Nanded), जालना (Jalna), बुलढाणा (Buldhana) या जिल्ह्यांत २१ जून रोजी अर्थात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या वाटचालीला मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Chanakya Niti About Parenting : या 10 गोष्टींची काळजी पालकांनी घेतली पाहिजेच, अन्यथा होईल सत्यानाश
Snake rabbit viral video: ससा आणि सापाच्या झुंजीचा थरारक व्हिडिओ; शेवट पाहून..
Lion bull viral video: तिन्हीं सिंहांचा बैलाने केला व्हॉलीबॉल; एकदा व्हिडिओ पाहाच..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम