Lust Stories 2 trailer: इंटीमेट सीन्सचा भरणा असणारा आणखी एक ट्रेलर रिलीज; तमन्नाने पार केल्या साऱ्या सीमा..

0

Lust Stories 2 trailer: अलीकडे ओटीपी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) अनेक दर्जेदार कंटेंट प्रेक्षकांना पाहायला मिळत असल्याने, या प्लॅटफॉर्मचे महत्व अधिक वाढलं आहे. दर्जेदार कंटेंट बरोबर इंटिमेट सीन्सचा (intimate scenes) देखील भरणा ओटीपी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये पाहायला मिळतो. साहजिकच यामुळे ओटीपी प्लॅटफॉर्मचे असंख्य प्रेक्षक आहेत. आता आणखी एक इंटिमेट सीन्स आणि बोल्ड डायलॉग असणारा लस्ट स्टोरी 2 (Lust Stories 2) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Tamannaah Bhatia Vijay Verma intimate scenes)

2018 मध्ये लस्ट स्टोरी (Lust Stories) हा चित्रपट रिलीज झाला होता. जो सुपरहिट ठरला होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग 19 जुलैला रिलीज होणार आहे. मात्र आतापासूनच या चित्रपटातील अभिनेत्रीने दिलेले इंटीमेट सीन चांगले चर्चेत आहे. आपला बॉयफ्रेंड विजय वर्मा (Vijay Verma) सोबत तिने इंटीमेट सीन्स दिले असल्याने, हा चित्रपट आणखीन चर्चेत राहिला आहे.

नुकताच नेटफ्लिक्स ओटीपी प्लॅटफॉर्मवर (Netflix ott platform) या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज केला आहे. ज्यामध्ये देखील तमन्ना भाटियाचे इंटीमेट सीन (Tamannaah Bhatia intimate scene) दाखवण्यात आले आहेत. महिलांकडे फक्त शारीरिक गरज म्हणून न पाहता महिलांच्या अपेक्षा, भावनांची जाणीव देखील असणे महत्त्वाचं असतं. हे सांगणारा हा चित्रपट आहे. तमन्ना भाटिया बरोबर अभिनेत्री नीना गुप्ताचे देखील बोल्ड सीन चर्चेत आहेत.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या झालेल्या Lust Stories 2 या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर दीड मिनिटाचा आहे. ज्यामध्ये देखील तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा या दोघांचे इंटीमेट सीन्स आहेत. सोबतच दीड मिनिटाच्या टेलरमध्ये बोल्ड डायलॉग देखील निर्मात्याने दाखवले आहेत. या चित्रपटांमध्ये अनेक आघाडीच्या तारकांचा समावेश असल्यामुळे हा चित्रपट अधिक चर्चेत आहे.

या चित्रपटांमध्ये मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) काजोल (Kajol) अमृता सुभाष तमन्ना भाटिया, नीना गुप्ता (neena Gupta) यासारख्या आघाडीच्या तारकांचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बॉलीवूडमधील ही आघाडीची नावे असल्याने अनेकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. काजोलचा पती हा इतर महिलांवर नजर टाकणारा दाखवण्यात आला आहे. ज्यामुळे काजल त्रस्त असल्याचं दाखवलं आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या ओटीपी प्लॅटफॉर्मवर 19 जुलैपासून पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा Aacharya Chanakya: या महिलांशी लग्न केल्यास घराचा विनाश होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही..

Chanakya Niti: पुरुषांच्या या तीन सवयींवर जीव ओवाळून टाकतात महिला..

Maharashtra Weather Forecast: पावसाची प्रतीक्षा संपली, या तारखेपासून पाऊस पडायला होणार सुरुवात; या भागात अलर्ट जारी

Maharashtra Rojgar Melava 2023: महाराष्ट्र सरकारकडून महाभरती, इथे होणार मेळावा; 10/12वी/ ITI आणि पदवीधरांना नोकरीची मोठी संधी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.