Darshana Pawar murder Case: ..म्हणून या किरकोळ कारणासाठी डिलिव्हरी बॉयनेच संपवलं दर्शना पवारला..

0

Darshana Pawar murder Case: एमपीएससी (MPSC) यूपीएससी (UPSC) करून अधिकारी होण्याचे स्वप्न असंख्य तरुण-तरुणी पाहतात. अंकेकांच्या गुणवत्ता असून देखील कठीण स्पर्धेमुळे हे स्वप्न सत्यात उतरत नाही. मात्र या सगळ्यांना छेद देत पुण्यामधील एमपीएससी टॉपर दर्शना पवार (darshana Pawar) हिने या स्पर्धेत यश मिळवलं. आपली मुलगी अधिकारी होईल, याची अनेक वर्ष आस लावून बसलेल्या कुटुंबाचं देखील स्वप्न साकार झालं. मात्र आपल्या मुलीवर काळ असा झाला घालणार आहे, कसलीही कल्पना कुटुंबाला नव्हती. (darshana Pawar case)

दर्शना पवार हिने एमपीएससी (darshana Pawar MPSC) परीक्षेच्या माध्यमातून वनविभागामध्ये यश मिळवले. राज्यात तिचा सहावा क्रमांक आला. दर्शना पवार ही एमपीएससीची तयारी पुण्यात राहून करत होती. एमपीएससी उत्तीर्ण झाल्यामुळे दर्शना पवारचा सत्कार ९ जूनला पुण्यामधील स्पॉट लाईट अकॅडमीत (spotlight academy) ठेवण्यात आला होता. मात्र 12 जून पासून दर्शना आमच्या संपर्का बाहेर गेल्याची माहिती दर्शनाच्या कुटुंबाने दिली.

12 जूनला आम्ही दर्शनाला दिवस-रात्र फोन करत होतो, मात्र तिने आमचे फोन घेतले नाही. त्यानंतर आम्ही स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये चौकशी केली असता, दर्शना आपल्या मित्रासोबत सिंहगड आणि राजगडवर ट्रेकिंगसाठी गेल्याचं समजलं. दर्शना राहुल दत्तात्रय हंडोरे (Rahul Handore) या आपल्या मित्रांसोबत गेल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलीसांनी राहुलचा शोध घ्यायला सुरुवात केली.

राहुल दत्तात्रय हंडोरे हा 12 तारखेपासूनच गायब असल्याने पोलिसांना देखील त्याच्यावर संशय आला होता. 18 जूनला राजगडच्या पायथ्याजवळ दर्शना पवार हिचा मृतदेह पोलिसांना सापडला. दर्शना पवार हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याने राहुलने ही हत्त्या 12 तारखेलाच केली असण्याची शक्यता आहे.

..अखेर अटक

दर्शना पवार हिचा मृतदेह 18 जूनला सापडल्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने करायला सुरुवात केली. अखेर आज मुंबईमधील रेल्वे स्टेशन वरून राहुलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी राहुलला पोलिसांनी माध्यमांसमोर हजर करताना आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती दिली.

..म्हणून केली हत्या..

आरोपी राहुल हंडोरे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे, आम्ही दोघेही पुण्यामध्ये एमपीएससीची तयारी करत होतो. मी डिलिव्हरीचे (delivery boy) काम करून एमपीएससीची तयारी करत होतो. आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करत होतो. मात्र दर्शना एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार नव्हती. आणि म्हणून लग्नाला नकार दिल्याने तिचा खून करण्यात आला, असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कशी झाली दोघांची ओळख..?

दर्शना पवार आणि आरोपी राहुल हे दोघेही लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. आरोपी राहुल मूळचा नाशिक जिल्ह्यातला आहे. तर दर्शना ही अहमदनगर जिल्ह्यामधील होती. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे. दोघेही एमपीएससी करत असल्यामुळे दोघांची जवळीक वाढली. दर्शना एमपीएससी उत्तीर्ण झाली. राहुलला मात्र अपयश आले. दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने राहुलने रागाच्या भरात तिचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मलाही त्याचे तुकडे करू द्या…

दर्शनाची आई सुनंदा पवार म्हणाल्या, माझ्या मुलीचे जसे त्याने तुकडे केले, त्याच पद्धतीने मला देखील त्याचे तुकडे करायचे आहेत. त्याला जगण्याचा कोणताही अधिकार नाही. त्याला फाशी झाली पाहिजे. तरच माझ्या मुलीला न्याय मिळेल. त्या दोघांची फक्त ओळख होते. मैत्री वगैरे काही नव्हते. त्याने फसवून माझ्या मुलीला नेले आणि तिची हत्या केली.

हे देखील वाचा Chanakya Niti on Humanity: या चार लोकांची साथ वेळीच सोडा, नाहीतर आयुष्य उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही..

Dilip Vengsarkar: ..म्हणून धोनीला विराट भारतीय संघात नको होता; निवड समिती अध्यक्षांच्या खुलाशाने खळबळ..

Lust Stories 2 trailer: इंटीमेट सीन्सचा भरणा असणारा आणखी एक ट्रेलर रिलीज; तमन्नाने पार केल्या साऱ्या सीमा..

Monkey drinking alcohol video: पट्ट्याने माकडाला पाजली तब्बल दोन पेग दारू; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.