Chanakya Niti on Humanity: या चार लोकांची साथ वेळीच सोडा, नाहीतर आयुष्य उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही..

0

Chanakya Niti on Humanity: जीवनामध्ये (Life) चांगल्या लोकांची संगत असावी, हे वाक्य तुम्ही अनेकदा अनेकांकडून ऐकलं असेल. संगत अशी गोष्ट आहे, जी तुमचे जीवन घडवूही शकते, आणि बर्बाद देखील करू शकते. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. कष्टाला पर्याय नाही, हे जरी खरं असलं तरी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात, यावर देखील खूप काही अवलंबून आहे.

आचार्य चाणक्यांनी (aacharya Chanakya) आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथामध्ये नातेसंबंधाविषयी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. जीवनामध्ये तुम्हाला चांगले सोबती हवेत. एक वेळ तुमच्या सोबत चांगले सोबती नसती तरीदेखील तुम्ही यश प्राप्त करू शकता. मात्र तुमचे सोबती हे वाईट प्रवृत्तीचे असतील, तर अफाट कष्ट करून देखील तुम्हाला यश मिळणार नाही. आणि म्हणून आचार्य चाणक्य सांगतात, अशा लोकांना वेळीच ओळखून त्यांच्यापासून दूर राहणे यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे.

आचार्य चाणक्य सांगतात, ज्या लोकांना तुमच्या भावनांची कदर नसते, अशा लोकांपासून दूर राहणे तुमच्या भविष्यासाठी योग्य असते. काही लोकांना फक्त स्वतःच्या हितापलीकडे काहीही दिसत नाही. अशा लोकांपासून तुम्हाला वेळोवेळी तोटे सहन करावे लागतात. ज्या लोकांना तुमच्या नुकसानाची पर्वा नसते, अशा लोकांजवळ चुकूनही जाऊ नये, असं आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात, जीवनात कधीच मूर्खांना उपदेश करायचा नसतो. ज्या लोकांना वस्तुस्थिती समजत नाही, अशा लोकांसोबत कधीच वाद घालायचा नसतो. कारण अशा लोकांसोबत वाद घातल्याने तुमच्या मानसिकतेवर याचा परिणाम होतो. कितीही चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, तरी या लोकांना पटत नाहीत. अशा लोकांपासून दूर राहणे अधिक उत्तम, असं चाणक्य सांगतात.

प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात महिलांचं महत्त्व खूप मोठं आहे. एक महिला पुरुषाचे आयुष्य स्वर्ग बनवू शकते तर नरक बनवण्याची ताकद देखील तिच्यामध्ये असते. पत्नी किंवा तुमच्या जीवनात असणारी महिला तुमच्या कुटुंबाला महत्त्व देत नाही, तुमच्या आई-वडिलांच्या मान-सन्मानाची, मुलांच्या भविष्याची काळजी करत नाही, अशा महिलांपासून दूर राहणे योग्य असल्याचे चाणक्य सांगतात.

जीवनामध्ये पैशाला खूप महत्त्व असलं तरी आचार्य चाणक्य यांच्यामध्ये, केवळ पैशाचा विचार करणारी माणसं कधीच तुमच्या भावनांशी एकरूप होऊ शकत नाहीत. ज्या लोकांना प्रत्येक गोष्टीमधून पैसे दिसतात, अशी माणसं खूप धोकादायक असतात. अशी माणसं पैशासाठी कोणालाही जवळ करतात. आणि वापरून फेकून देतात, असं आचार्य चाणक्य सांगतात. म्हणून अशा लोकांपासून दूर राहणे योग्य असल्याचे चाणक्य सांगतात.

चाणक्य सांगतात, ज्या माणसांना तुमच्या आत्मसन्मानाचं काहीही देणंघेणं नसतं, अशांपासून दोन हात दूर राहणं, केव्हाही चांगलं. नातं हे केवळ प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टींव्यतिरिक्त एकमेकांचा सन्मान यावर देखील टिकून असतं. किंबहुना प्रेम विश्वासापेक्षा नात्यात सन्मान फार महत्त्वाचा असतो. आणि म्हणून आचार्य चाणक्य सांगतात, जर तुमच्या आत्मसन्मानाला वारंवार ठेच पोहोचत असेल, तर अशा लोकांपासून दूर राहणे अधिक उत्तम.

हे देखील वाचा Aacharya Chanakya: या महिलांशी लग्न केल्यास घराचा विनाश होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही..

Dilip Vengsarkar: ..म्हणून धोनीला विराट भारतीय संघात नको होता; निवड समिती अध्यक्षांच्या खुलाशाने खळबळ..

Monkey drinking alcohol video: पट्ट्याने माकडाला पाजली तब्बल दोन पेग दारू; पाहा व्हिडिओ..

Lust Stories 2 trailer: इंटीमेट सीन्सचा भरणा असणारा आणखी एक ट्रेलर रिलीज; तमन्नाने पार केल्या साऱ्या सीमा..

Maharashtra Weather Forecast: पावसाची प्रतीक्षा संपली, तारखेपासून पाऊस पडायला होणार सुरुवात; या भागात अलर्ट जारी

Chanakya Niti About Parenting : या 10 गोष्टींची काळजी पालकांनी घेतली पाहिजेच, अन्यथा होईल सत्यानाश

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.