Maharashtra politics: त्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटलांच्या डोळ्यात आलं पाणी; पाहा व्हिडिओ..

0

Maharashtra politics: गेल्यावर्षीप्रमाणे महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला. भाजपच्या (bjp) मदतीने पुन्हा एकदा राष्ट्रवादी (NCP) पक्ष फोडण्यात आल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक (lokasabha 2024) डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी (mahavikas aaghadi) फोडण्याचा प्रयत्न झाला. केंद्रीय यंत्रणांचा दबाव, मंत्रिपदाची आमिषा दाखवून राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांना भाजपने आपल्या सोबत येण्यासाठी भाग पाडलं, असा देखील आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

अजित पवारांच्या (ajit Pawar) नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते भाजप सोबत सत्तेत सामील झाले. एका वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फुटल्यानंतर, अनेकांनी उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांचा देखील समावेश होतो. मात्र आता शरद पवार यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकजूट ठेवता आला नाही. धक्कादायक म्हणजे, शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे नेतेही भाजपच्या गळाला लागले.

शरद पवार यांच्या जवळचे आणि अत्यंत विश्वासू असणारे अनेक नेते भाजपच्या गळाला लागले. यामुळे अनेकांना धक्का बसला. मात्र या सर्वांमध्ये मोठा धक्का शरद पवार यांच्याबरोबर महाराष्ट्राच्या जनतेला देखील बसला, तो दिलीप वळसे-पाटील यांच्या जाण्याने. दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांचे मानसपुत्र संबोधलं जायचं. मात्र त्यांनी देखील शरद पवारांची साथ सोडत भाजपच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवलं.

शरद पवार यांचे नातू रोहित पवार (rohit Pawar) आपल्या ट्विटरच्या माध्यमातून भाजपच्या सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी नेत्यांना शरद पवारांनी काय कमी केलं होतं, याचा पाढा वाचून दाखवत आहेत. यामध्ये त्यांनी दिलीप वळसे पाटील (Dilip walse patil) यांना देखील टार्गेट केलं. पवार साहेबांनी दिलीप वळसे-पाटलांना आतापर्यंत काय काय दिलं, याची यादी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केली आणि असा अन्याय आमच्यावरही करा, असे सर्वसामान्य म्हणू लागले आहेत असा देखील उपरोधिक टोला लगावला.

काल आंबेगावमध्ये दिलीप वळसे-पाटील यांनी सभा घेतली. या सभेनंतर माध्यमाची संवाद साधताना पत्रकाराने प्रश्न विचारला, दिलीप वळसे पाटलांना शरद पवार यांनी आतापर्यंत काय-काय दिलं हे सांगत, तुमच्यावर टीका केली आहे, असा प्रश्न विचारला. यावर दिलीप वळसे-पाटील म्हणाले, हे खरंच आहे. पवार साहेबांनी मला खूप पदे दिली, हे मी मान्यच करतो.

शरद पवार यांनी मला विविध पदे दिली, हे सांगताना दिलीप वळसे पाटील भाऊक झाले. यावर पत्रकार म्हणाले, तुम्ही भावुक झाला आहात शरद पवार यांना सोडण्याचे दुःख आहे? वेदना होत आहेत? असा सवाल उपस्थित करतात, दिलीप वळसे पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं, आणि ते माध्यमाला न बोलता निघून गेले.

हे देखील वाचा Tomato Price Hike: का वाढले टोमॅटोचे दर? या तारखेनंतर टोमॅटोच्या दरात होणार मोठी घसरण.

Age Of Love: या वयात मुलींना प्रेम झालं तर कधीच देत नाहीत धोका..

IND vs WI: Star sports, JioCinema नाही, फक्त याच ठिकाणी पाहता येईल IND vs WI मालिका..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.