Age Of Love: या वयात मुलींना प्रेम झालं तर कधीच देत नाहीत धोका..

0

Age Of Love: असं म्हटलं जातं, प्रेमाशिवाय (love) हे आयुष्य अपूर्ण आहे. प्रेम ही एक खूप सुंदर कल्पना आहे. प्रेमात पडणाऱ्या व्यक्तीला नको असणारं हे जग अचानक सुंदर दिसू लागतं. मुलगी असो वा मुलगा प्रत्येकाला आयुष्यात प्रेम हे होतच असतं. अलीकडे प्रेम उघडपणे जाहीर करताना मुली देखील संकोच करत नाहीत. असं असलं तरी प्रत्येकाचं प्रेम यशस्वी होतच असं नाही. (Love is most important thing is life)

प्रत्येकाला आपल्यावरही कोणीतरी प्रेम करणारं असावं, असं वाटत असतं. याबरोबरच मुलीने आपल्याला सोडून जाऊ नये, अशी प्रत्येक मुलाची इच्छा देखील असते. मात्र बऱ्याचदा प्रेमात अपेक्षित असं घडत नाही. प्रेम करणाऱ्या व्यक्तीने आपल्याला सोडून जाऊ नये, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

प्रेमात पडायचं प्रत्येकाचं एक ठराविक वय असतं. काहीजण प्रेमात लवकर पडतात, तर काही जणांना प्रेमाची ओळख उशिरा होते. एका संशोधनानुसार, मुलीचं प्रेम करण्याचे योग्य वय स्पष्ट करण्यात आले आहे. मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये लवकर परिपक्वता येते. मुलीने सोळाव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर, तिला बऱ्याच गोष्टीची उकल होते. मात्र या वयात मुलींना प्रेम झालं, तर अधिक अडचणीचा सामना करावा लागतो. त्याचे कारण म्हणजे अपरिपक्वत. या वयामध्ये प्रेम लवकर संपुष्टात येण्याची देखील शक्यता असते.

कॉलेजमध्ये शाळेमध्ये देखील मुली प्रेमात पडतात. मात्र हे प्रेम फार काळ टिकत नाही. शिवाय या प्रेमामध्ये अडचणींचा देखील सामना करावा लागतो. मुलींचे प्रेमात पडण्याचे योग्य वय हे वीस वर्षे निश्चित करण्यात आले आहे. वीस वर्षांनंतर मुली प्रेमात पडल्या, तर हे प्रेम दीर्घकाळ टिकते. वीस वर्षानंतर मुलींमध्ये कमालीची परिपक्वता आलेली असते. काय योग्य आणि काय अयोग्य, या गोष्टींची उकल या वयात मुलींना अधिकतेने होते. (girl age of love)

वीस वर्षानंतर मुलींना भावनिकते बरोबर वास्तवाची देखील जाणीव होते. साहजिकच वास्तवाची जाणीव असल्यामुळे, मुली या वयात समाजामधील आपल्या प्रतिष्ठेचा देखील विचार करतात. त्याबरोबरच आपण निवडलेली व्यक्ती योग्य आहे की नाही, याचा देखील विचार करून मुली रिलेशनशिपमध्ये कमिटमेंट करतात. आणि म्हणून मुलींचे प्रेम करण्याचे योग्य वय 20 वर्ष असल्याचे म्हटले गेले आहे. या वयात प्रेम झाल्यानंतर मुली सहसा मुलांना सोडून जात नाहीत.

हे देखील वाचा Tomato Price Hike: का वाढले टोमॅटोचे दर? या तारखेनंतर टोमॅटोच्या दरात होणार मोठी घसरण..

Sharad Pawar: असा ठरला राष्ट्रवादीच्या आमदारांचा डबल रेट; भाजपमध्ये सामील होणाऱ्या आमदारांना शंभर खोके..

PM Kisan Yojana: योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाइन अर्ज; या दिवशी जमा होणार चौदावा हप्ता..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.