Sharad Pawar: असा ठरला राष्ट्रवादीच्या आमदारांचा डबल रेट; भाजपमध्ये सामील होणाऱ्या आमदारांना शंभर खोके..

0

2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना (shivsena) राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (congress) या तिन्हीं प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन 2019 च्या विधानसभा निवडणुक निकालानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. (Mahavikas aaghadi) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने कोरोणा काळात उल्लेखनीय कामगिरी देखील केली. मात्र त्यानंतर भाजपच्या मदतीने शिवसेना पक्ष फोडण्यात आला, आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता बरोबर एका वर्षानंतर पुन्हा एकदा या घटनेची पुनरावृत्ती झाली असून, अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. (Sharad Pawar vs Ajit Pawar)

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला. आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार शिवसेना पक्षातून बाहेर पडले. अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करतात, आपल्या आमदारांना अधिक निधी देतात, आणि शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत, असा देखील आरोप करण्यात आला. यामध्ये गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे, संदिपान भुमरे अशा अनेक नेत्यांचा समावेश होता.

एकीकडे शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांकडून उद्धव ठाकरे यांना सोडण्याचे कारण राष्ट्रवादी सांगण्यात येत असलं, तरी दुसरीकडे मात्र ग्राउंड लेव्हलवर चित्र वेगळं पाहायला मिळालं. इन्कम टॅक्स, सीबीआय ईडीच्या माध्यमातून शिवसेना पक्ष फोडण्यात आला. याबरोबरच आमदाराला प्रत्येकी 50 कोटी रुपये देण्यात आले, असं अनेक माध्यमांनी नागरिकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया मधून समोर आलं. प्रत्यक्षात 50 कोटी घेतले की नाही? हा चौकशीचा विषय असला, तरी सर्वसामान्यांना यावर घट्ट विश्वास बसला आहे.

Income tax, CBI, ED आणि पन्नास कोटींच्या मदतीने शिवसेना हा पक्ष फोडून दोन गट तयार करण्यात आले. अशी सर्वसामान्यांची धारणा तयार झाली आहे. अशातच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत हाच प्रयोग पाहायला मिळत आहे. ईडी सरकारला कोणताही धोका नसताना, राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे काय कारण असावं? असा प्रश्न देखील सोशल मीडियावर उपस्थित केला गेला. 2024 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आल्याचे बोललं जाऊ लागलं.

2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, राष्ट्रवादी पक्ष फोडला असला तरी अनुभवी आणि दिग्गज नेते भाजपच्या गळ्याला कसे लागले? हा प्रश्न सोशल मीडियावर गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जात होता. मात्र आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ज्याप्रमाणे शिवसेना पक्षाच्या आमदारांना 50 खोके देण्यात आले, त्याच पद्धतीने राष्ट्रवादीच्या आमदारांना भाजप सोबत जाण्यासाठी 100 खोके देण्यात आल्याची चर्चा रंगल्याने खळबळ उडाली आहे.

भाजप सत्तेत आल्यापासून, Income tax, CBI, ED या स्वायत्त संस्थाचा विरोधकांना फोडण्यासाठी मोठा दुरुपयोग केला गेला. हे आता लपून राहिले नाही. सर्वसामान्य नागरिक देखील हे आता उघडपणे बोलू लागले आहेत. सोबतच सत्ता आणि पैशासाठी नैतिकता, निष्ठा, विचारांना वेशीवर टांगणारे नेते देखील भाजपच्या गळ्याला लागत असल्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे. आज या बातमीला अंबादास दानवे यांनी दुजोरा दिला आहे.

शिवसेना नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या संदर्भात एक ट्विट केले आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारमध्ये खेचण्यासाठी 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची डील झाल्याची चर्चा आहे. अशा स्वरूपाचं ट्विट त्यांनी केलं आहे. या निधीचं वाटप दोन टप्प्यात करण्यात येणार असून, यावर्षी 50 कोटी तर पुढल्या वर्षी 50 कोटी देण्यात येणार आहेत. सोशल मीडियावर देखील राष्ट्रवादीचे आमदार फोडण्यासाठी शंभर कोटीच्या निधीची डील झाली असल्याचं मोठ्या प्रमाणात बोललं जाऊ लागलं आहे.

हे देखील वाचा Chanakya Niti On Success: ..म्हणून या तीन लोकांकडे वाईट काळ फिरकतही नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.