IND vs WI: Star sports, JioCinema नाही, फक्त याच ठिकाणी पाहता येईल IND vs WI मालिका..

0

IND vs WI: वर्ल्ड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2023) फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर आता भारतीय संघ वेस्टइंडीज विरुद्ध कसोटी, वनडे आणि टी ट्वेंटी सामन्याची मालिका खेळणार आहे. 12 जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, यामध्ये दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि पाच टी20 सामन्याची मालिका खेळण्यात येणार आहे. काही नवीन खेळाडूंना या मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे.

भारताच्या तुलनेत वेस्टइंडीजचा संघ दुबळा आहे. मात्र असं असलं तरी नवीन खेळाडूंना या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. या मालिकेत हे खेळाडू कसा खेळ करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट (star sport) आणि जियो सिनेमावर (JioCinema) भारत आणि वेस्ट इंडिज मालिका पाहता येणार नाही. (IND vs WI)

पाच ऑक्टोंबर पासून भारतामध्ये वनडे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाची तयारी म्हणून, वेस्ट इंडिज दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. सहाजिकच यामुळे संघ बांधणीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुन्हा एकदा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat kohli) टी20 संघात संधी मिळाली नाही. भारत पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात टीट्वेंटी संघाची वाटचाल करणार आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टी ट्वेंटी संघामध्ये अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये (IPL) उत्कृष्ट कामगिरी केलेल्या यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रवी बिष्णोई, मुकेश कुमार, संजू सॅमसन या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. जितेश शर्मा आणि रिंकू सिंग या दोघांना संधी मिळेल असं वाटत होतं. मात्र या दोघांना देखील संधी मिळाली नाही.

एकंदरीतच वेस्टइंडीजचा दौराकडे अनेक क्रिकेट चाहत्याचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र या दौऱ्याचा थेट प्रक्षेपण क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट आणि जियो सिनेमावर पाहता येणार नाही. या दौऱ्याचे थेट प्रक्षेपण क्रिकेट चाहत्यांना फॅनकोड (fancode) या ott platform वर पाहता येणार आहे. याशिवाय जर तुम्ही टेलिव्हिजनवर ही मालिका पाहू इच्छित असाल, तर दूरदर्शन आणि DD sports या वाहिनीवर देखील तुम्ही पाहू शकता.

हे देखील वाचा Age Of Love: या वयात मुलींना प्रेम झालं तर कधीच देत नाहीत धोका..

Tomato Price Hike: का वाढले टोमॅटोचे दर? या तारखेनंतर टोमॅटोच्या दरात होणार मोठी घसरण..

PM Kisan Yojana: योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाइन अर्ज; या दिवशी जमा होणार चौदावा हप्ता..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.