Career After 12th Stream: 12वी कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी हे आहेत सात सर्वोत्तम पर्याय; एडमिशन मिळाल्यास जीवन जाईल बदलून..

0

Career After 12th Stream: देशासह महाराष्ट्र शिक्षण मंडळाने देखील बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. (12th result) विद्यार्थ्यांना आता बारावीनंतर, वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश घेण्याचे वेध लागले आहेत. अनेकांचा बारावीनंतर काय करायचं, हा निर्णय झाला आहे. मात्र खूप सारे विद्यार्थी दुविधा मनस्थितीत आहेत. बारावीनंतर कोणत्या क्षेत्राकडे वळल्यावर आपण आपलं करिअर करू शकतो, असे असंख्य प्रश्न बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना असतात. आज आपण बारावी कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी करिअरचे काय पर्याय आहेत, हे जाणून घेणार आहोत.

CA कोर्स 

जर तुम्ही कॉमर्स मधून बारावीचे शिक्षण पूर्ण केलं असेल, आणि तुम्ही चांगले मार्क्स मिळवले असतील. या क्षेत्रामध्ये तुम्ही गुणवत्ता सिद्ध केली असेल, याशिवाय अकाउंटंट या विषयात तुम्ही नाविन्यपूर्ण यश मिळवले असेल, तर तुम्ही हा कोर्स करताना मागे पुढे पाहण्याची गरज नाही. तुम्ही सीएची तयारी करण्यास काहीही हरकत नाही. सीए उमेदवारांना देशभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लाखोंचे नव्हे, तर कोट्यावधीचे पॅकेज तुम्हाला सीए झाल्यानंतर मिळू मिळते.

बीकॉम, एमकॉम, पीएचडी

जर तुम्ही कॉमर्स मधून बारावी केलेली असेल. आणि तुम्हाला शिकवण्याची आवड असेल, तर तुम्ही या क्षेत्राकडे वळू शकता. बीकॉम, एमकॉम आणि पीएचडी केल्यानंतर, ‘असिस्टंट प्रोफेसर’ म्हणून तुम्हाला चांगल्या विद्यापीठात उत्तम नोकरी लागू शकते. याशिवाय तुम्ही प्राध्यापक देखील होऊ शकता. प्राध्यापक होण्यासाठी तुम्हाला शिक्षकाचा आठ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

BBA, MBA

बारावी कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी बीबीए आणि एमबीए क्षेत्रामध्ये देखील उत्तम संधी आहे. चांगल्या कॉलेजमधून तुम्ही हा कोर्स करून या क्षेत्रात आपलं भविष्य उज्वल करू शकता. काही दिवसांत IIM मध्ये MBA मध्ये प्रवेश करण्यासाठी CAT अर्ज सुरू होतील. अर्ज केल्यानंतर, तुम्ही ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास, तुम्हाला IIM या नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळू शकतो. कमी गुण मिळाले, तरी देखील तुम्ही इतर नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश करू शकता.

फोटोग्राफी

फोटोग्राफीला देखील प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे. जर तुम्ही या क्षेत्राकडे वळणार असाल, तरी देखील तुम्हाला या क्षेत्रात उत्तम करिअर करता येऊ शकतं. बारावीमध्ये जर तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील, आणि तुम्हाला प्रवास करण्याची आवड असेल. तर तुम्ही या क्षेत्राकडे डोळे झाकून वळू शकता. फोटोग्राफी त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफीचा एखादा कोर्स करून तुम्ही तुमचे करिअर निवडू शकता.

फैशन डिजाइनिंग

बारावीनंतर, कमी मार्क्स मिळाले म्हणून खचून न जाता विद्यार्थ्यांनी पुन्हा जोमाने उभे राहणे आवश्यक असते. कमी मार्क्स मिळाले म्हणजे, आपली करिअर करण्याची संधी संपली, असं अजीबात होत नाही. जर तुम्हाला बारावीमध्ये कमी मार्क मिळाले असतील, तर तुम्ही फॅशन डिझाईन क्षेत्राकडे एक उत्तम करिअर म्हणून पाहू शकता. अलीकडे या क्षेत्रात प्रचंड स्कोप आहे. फॅशन डिझायनिंग हा कोर्स तुम्ही एखाद्या चांगल्या विद्यापीठातून करून तुमचं करिअर घडवू शकता. जर तुम्ही NIFT मधून का कोर्स केला, तर प्लेसमेंटची चिंता तुम्हाला अजिबात येणार नाही.

डिप्‍लोमा इन बैंकिंग

बारावी कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन बँकिंग हा कोर्स देखील करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देणारा आहे. जर फायनान्स हख विषयी तुमच्या आवडीचा असेल, तर तुम्ही यामध्ये डिप्लोमा करू शकता. बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीच्या अनेक नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. बँकिंग पदविका अभ्यासक्रमामध्ये उमेदवारांना बँकेची रचना, बँकिंग कायदा, विदेशी व्यापार आणि परकीय चलन, बँक ग्राहक संबंध, असे विषय अभ्यासक्रमाला येतात. या डिप्लोमाचा कालावधी एका वर्षाचा असणार आहे.

हे देखील वाचा smartphone buying tips: तुमचा स्मार्टफोन duplicate तर नाही? या पाच गोष्टी तपासून करा स्पष्ट..

Maharashtra politics: त्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटलांच्या डोळ्यात आलं पाणी; पाहा व्हिडिओ..

IND vs WI: Star sports, JioCinema नाही, फक्त याच ठिकाणी पाहता येईल IND vs WI मालिका..

Age Of Love: या वयात मुलींना प्रेम झालं तर कधीच देत नाहीत धोका..

Tomato Price Hike: का वाढले टोमॅटोचे दर? या तारखेनंतर टोमॅटोच्या दरात होणार मोठी घसरण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.