India vs Pakistan world cup 2023: पाकिस्तान संघाशिवाय होणार वनडे विश्वचषक; पाकिस्तान सरकारने घेतला निर्णय..

0

India vs Pakistan world cup 2023: भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) क्रिकेट (cricket) सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असतं. भारत आणि पाकिस्तान दोन्हीं देशाचे नागरिक कमालीचे क्रिकेट प्रेमी आहेत. या दोन्हीं देशामध्ये क्रिकेटला खूप फॉलो केलं जातं. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही संघामध्ये एकही क्रिकेट मालिका झालेली नाही. हे दोन्हीं संघ एकमेकांविरुद्ध केवळ आयसीसी स्पर्धेतील सामने खेळतात. मात्र आता भारतामध्ये होणाऱ्या आगामी वन डे विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ येणार की नाही, याविषयी अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. (World Cup 2023)

यावर्षी होणाऱ्या आशिया कप (Asia Cup 2023) स्पर्धेचे आयोजक पाकिस्तान आहे. मात्र पाकिस्तानमध्ये भारत क्रिकेट खेळणार नाही, अशी भूमिका BCCI ने घेतली. भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, पाकिस्तानला देखील नमती भूमिका घ्यावी लागली. आणि आता आशिया कप श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तानमध्ये भारत खेळणार नसून, भारताचे सामने श्रीलंकेमध्ये ठेवण्यात आले आहेत.

भारत पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धेचे सामने खेळणार नसल्याने पाकिस्तान संघ देखील आगामी विश्वचषकासाठी भारतात येणार नसल्याचे सुरुवातीला सांगितलं गेलं. मात्र नंतर पाकिस्तान संघाने विश्वचषकासाठी आपली नोंदणी केली. वनडे वर्ल्डकप मधील भारत आपला तिसरा सामना पाकिस्तान संघाविरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर खेळणार आहे. तर पाकिस्तानचे उर्वरित सामने हे दक्षिण भारतामध्ये खेळवले जाणार आहेत.

आगामी विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाने नोंदणी केल्यानंतर, भारताकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र आता पाकिस्तान सरकारचे क्रीडा मंत्री एहसान मजारी (ehsan mazari) यांनी म्हंटले आहे, भारत आशिया चषक स्पर्धेतील सामने खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये आला नाही, तर आम्ही देखील विश्वचषकामधील आमचे सामने भारताशिवाय तटस्थ ठिकाणी खेळू.

आगामी विश्वचषकासाठी पाकिस्तानला भारतात पाठवायचे की नाही, हा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान सरकारची सुरक्षा समिती ठरवणार आहे. साहजिक यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना भारतामध्ये होणारा विश्वचषक हा पाकिस्तान संघाशिवाय होतो की काय, अशी चिंता वाटू लागली आहे.

हे देखील वाचा IND vs WI test: यशस्वी येणार सलामीला, असा आहे रोहितने जाहीर केलेला संघ..

Relationship: ..म्हणून या तीन पोरांकडे पोरी ढुंकूनही पाहत नाहीत..

ODI World Cup Ticket Rates: वर्ल्डकप सामन्यांचे तिकीट दर जाहीर; चाहत्यांमध्ये आनंदी आनंद..

Running Shoes For Men: या वेबसाइटवर ब्रँडेड रनिंग शूज मिळतायत निम्म्या किंमतीत..

Tiger monkey video: माकडाने दोन वाघांना करून सोडलं सळो की पळो; व्हिडिओ पाहून बसाल डोळे चोळत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.